Temple Renovation: मदुरैतील ३०० वर्षे जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद

14 Mar 2026 12:17:03
 
Temple Renovation
 
मुंबई: (Temple Renovation) तमिळनाडूच्या मदुरै जिल्हातील पेरैयूर तालुक्यात असलेल्या थुम्मनायक्कनपट्टी गावामध्ये सुमारे ३०० वर्षे जुन्या विनायगर आणि करुप्पन्नास्वामी मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद निर्माण झालाय. गावातील काही धर्मांध मुस्लिम लोक मंदिराच्या नूतनीकरणाला विरोध करत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Temple Renovation)
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे मंदिर सुमारे २ एकर ४० सेंट जमिनीवर पसरलेले आहे आणि त्याचे व्यवस्थापन पारंपरिक विश्वस्त तसेच हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल इंडोवमेंट्स डिपार्टमेंट तमिळनाडू यांच्याकडून केले जाते. मंदिर प्रशासनाला नूतनीकरणासाठी राज्य आणि जिल्हा तज्ज्ञ समित्यांकडून मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी सकुल हमीद नावाच्या व्यक्तीने मंदिराच्या जीर्णोद्धाराविरोधात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरै बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. (Temple Renovation)
 
मात्र यावर्षी जानेवारीमध्ये उच्च न्यायालयाने मंदिराच्या नूतनीकरणाला परवानगी दिली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने काम सुरू करताना सुरक्षेसाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली, ज्यावर न्यायालयाने पोलिसांना सुरक्षा देण्याचे निर्देशही दिले. (Temple Renovation)
 
मंदिराचे वंशपरंपरागत विश्वस्त महेश्वरन आणि गावकऱ्यांनी कुंभाभिषेकमपर्यंत सुरक्षा देण्याची मागणी मदुरै पोलिसांकडे केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की मंदिराजवळ सुमारे १०० वर्षांपूर्वी एक मशिद बांधण्यात आली होती. जेव्हा मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा काही धर्मांध मुस्लिम लोक मंदिर परिसरात येऊन विरोध करू लागले आणि मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करू लागले. पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र विरोध अद्यापही सुरू आहे. (Temple Renovation)
 
 
Powered By Sangraha 9.0