Hotel Majghar: एलपीजी टंचाईत लालबागच्या ‘हॉटेल माजघर’चा नवा प्रयोग

14 Mar 2026 18:18:45
Hotel Majghar
 
मुंबई : (Hotel Majghar) अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद आता मुंबईतील हॉटेल व्यवसायावरही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर लालबागमधील हॉटेल माजघर या मालवणी सीफूड रेस्टॉरंटने परिस्थितीशी जुळवून घेत पर्यायी मार्ग शोधत स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्ह आणि फ्रायर्सचा वापर सुरू केला आहे. (Hotel Majghar)
 
सध्या महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता १०० टक्के बंद करण्यात आल्याने अनेक रेस्टॉरंट्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक हॉटेल्सनी त्यांच्या मेनूमध्ये कपात केली आहे, तर काही लहान हॉटेल्सनी तात्पुरते शटर खाली ओढले आहे. मात्र हॉटेल माजघरने या संकटाला संधी मानत पर्यायी मार्ग स्वीकारत आपली सेवा अखंड सुरू ठेवली आहे. (Hotel Majghar)
 
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून एलपीजीऐवजी इंडक्शन स्टोव्हवर स्वयंपाक करण्यास सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, या बदलानंतरही रेस्टॉरंटने मेनूमध्ये कोणतीही कपात केलेली नाही आणि पदार्थांच्या किंमतीतही वाढ केलेली नाही. ग्राहकांना पूर्वीसारख्याच चवीचे अन्न मिळत असल्याने या निर्णयाचे कौतुकही होत आहे. (Hotel Majghar)
एलपीजी स्टोव्हच्या तुलनेत इंडक्शन स्टोव्हवर स्वयंपाक करण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. आधी पाच मिनिटांत तयार होणारा पदार्थ आता सुमारे १५ मिनिटांत तयार होत आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर जेवण देणे हे सध्या कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Hotel Majghar)
 
कर्मचाऱ्यांच्या मते, “आम्हाला या नवीन पद्धतीशी जुळवून घ्यायला अजून वेळ लागेल. ग्राहकांना लवकर जेवण मिळण्याची अपेक्षा असते, त्यामुळे वेळेवर सेवा देणं हे मोठं आव्हान ठरत आहे.” (Hotel Majghar)
 
 
Powered By Sangraha 9.0