या गुढीपाडव्याला आपले 'घर' असे सजवा!

14 Mar 2026 14:09:48
 
Gudi Padwa
 
हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि तो नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.याच दिवशी पौराणिक कथेनुसार, श्रीरामाने १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून आणि रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते. त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून लोकांकडून गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. तसेच या दिवशी ब्रह्मादेवाने विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात केली, असे मानले जाते. म्हणुन या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, साखरेच्या गाठी व कडुनिंबाच्या पानांचे प्रसाद वाटले जातात. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हिंंदु संस्कृतीमधील अनन्यसाधारण महत्व असलेल्या या गुढीपाडव्याला तुम्ही तुमचे घर असे सजवु शकता.  
 

Gudi Padwa 
 
१) पारंपारिक गुढी उभारा
 
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे हा सणाचा मुख्य भाग आहे. बांबूच्या काठीला नवीन साडी, कडुनिंबाच्या डहाळ्या, आंब्याची पाने आणि फुलांचा हार लावून सुंदर गुढी बनवा. ही गुढी विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानली जाते.
 

Gudi Padwa 
 
२) घराचे प्रवेशद्वार सजवा
 
गुढीपाडव्याला घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे, झेंडूच्या फुलांचे तोरण लावून सुंदर अशी सजावट करू शकता.

Gudi Padwa
 
३) सुंदर रांगोळी काढा
 
गुढीपाडव्याला घराच्या प्रवेशद्वारावर गुढी, कलश, स्वस्तिक किंवा फुलांची रांगोळी काढू शकता. किंवा तुम्ही फुलांची ही आकर्षक अशी रांगोळी काढु शकता. रांगोळीच्या आजुबाजुला पणत्या लावून सजावट पूर्ण करा, ज्यामुळे घराचे प्रवेशद्वार पारंपारिक आणि आकर्षक होईल.
 
 
Gudi Padwa
 
४) फुलांनी घराची सजावट करा
 
घरातील देवघर, हॉल किंवा दरवाज्याजवळ झेंडू, गुलाब किंवा मोगऱ्याच्या फुलांची सजावट करा. फुलांचे हार, छोट्या फुलांच्या वाट्या किंवा फुलांची माळ लावल्याने घरात सकारात्मक आणि आनंददायी वातावरण तयार होते.
 

Gudi Padwa 
 
५) पारंपरिक दिवे आणि पणत्या
 
संध्याकाळी घराच्या बाल्कनीत, खिडक्यांजवळ किंवा देवघरात मातीच्या पणत्या लावा. यामुळे घरात पवित्र वातावरण तयार होते.

Gudi Padwa
 
६) देवघराची विशेष सजावट
 
गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरात स्वच्छता करून फुलांची सजावट करा.

Gudi Padwa 
 
७) देवघरात पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
 
या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, कडुनिंब-गूळ यांसारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ सुंदर ताटात मांडून देवाला नैवेद्य दाखवा.
 
 
Powered By Sangraha 9.0