ऊर्जा व्यवस्थापन विषयात अतुल खराटे यांना पीएचडी

14 Mar 2026 17:30:20
Atul Kharate
 
मुंबई : (Atul Kharate) ऊर्जा व्यवस्थापन या विषयातील संशोधनासाठी मुंबईचे अतुल खराटे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई यांच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. देश आणि महाराष्ट्रातील ऑइल व गॅस क्षेत्राची सध्यस्थिती, सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन व्यवस्था तसेच राज्यातील हरित ऊर्जेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व धोरणे या विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे.
 
डॉ. अतुल खराटे हे सध्या इंडियन ऑइल अदाणी वेंचर्स लिमिटेड येथे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून कार्यरत आहेत. मूळचे विदर्भातील खामगाव येथील असलेले डॉ. खराटे सध्या मुंबईत वास्तव्यास असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत आहेत.
 
हेही वाचा : दिव्यांग कल्याण विभाग आता 'दिव्यांग सक्षमीकरण विभाग'
 
तसेच तंत्रज्ञान, सामाजिक आणि व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील विविध राष्ट्रीय संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत. उद्योग क्षेत्राशी संबंधित संघटनांमध्ये त्यांचा सहभाग असून भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीसह विविध उद्योग संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. याशिवाय कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी तसेच कार्बन कॅप्चर विषयाशी संबंधित संस्थांमध्ये ते राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0