US Military Plane Crash : अमेरिकेचे 'फ्यूल टँकर' पाडल्याचा इराणचा दावा! KC-135 विमान इराकमध्ये कोसळलं

    13-Mar-2026   
Total Views |
US Military Plane Crash

मुंबई : (US Military Plane Crash) अमेरिकेच्या लढाऊ विमानांना इंधन पुरवणारे लष्करी विमान इराकमध्ये कोसळले असून यामध्ये असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यूएस सेंट्रल कमांडने याबाबत शुक्रवारी अधिकृत माहिती दिली. अपघातग्रस्त केसी १३५ एरिअल टँकर विमान हे लांब पल्ल्यांच्या मोहिमांमध्ये विमानांना इंधन पुरवण्यासाठी हे विमान वापरले जात असे.(US Military Plane Crash)

यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, "१२ मार्च रोजी पश्चिम इराकमध्ये अमेरिकेचे केसी-१३५ विमान कोसळले. दोन रिफ्युलिंग विमाने होते. त्यापैकी एक विमान सुरक्षितपणे उतरले, तर दुसरे पश्चिम इराकमध्ये विमान कोसळले. ही घटना ना शत्रूने केलेल्या हल्ल्यामुळे घडली आहे, ना चुकून झालेल्या गोळीबारात. सध्या बचाव कार्य सुरू आहे आणि याचा तपास केला जात आहे. ऑपरेशन एपिक फ्युरीच्या दरम्यान मित्र राष्ट्राच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मात्र, इराकमध्ये कार्यरत असलेल्या इराण-समर्थित इस्लामिक गटाने विमान पाडण्याची जबाबदारी स्वीकारली आहे."(US Military Plane Crash)

या दुर्घटनेत अमेरिकेचे इंधन पुरवठा करणारे विमान पाडल्याचा दावा इराणी लष्कराने केला आहे. दुसरीकडे, इराणचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. हा कोणताही शत्रू राष्ट्राचा हल्ला नसून तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात असण्याचे अमेरिकेनं म्हटले. (US Military Plane Crash)




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\