Pune Gas Supply: पुणेकरांसाठी खुशखबर! गॅसची होणार होम डिलिव्हरी

    13-Mar-2026   
Total Views |
Pune Gas Supply
 
पुणे : (Pune Gas Supply) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका देशभर जाणवत आहे. होर्मुझ मार्ग बंद झाल्यामुळे गॅस पुरवठ्यात तुटवडा जाणवत आहे. अनेक व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल बंद पडले आहेत, तर घरगुती गॅससाठी नागरिकांमध्ये मोठी गर्दी दिसून आली आहे.
 
घरगुती गॅसचा साठा उपलब्ध
प्रशासनाने याबाबत गॅस एजन्सींची बैठक घेतली असून त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले की, पूर्वीसारखाच घरगुती गॅस घरोघरी पोहोचवला जाईल. "पूर्वीप्रमाणे एक ते दोन दिवसात गॅससाठी लागणारी गर्दी आता होणार नाही," असे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागणार नाहीत.
 
गॅसची होम डिलिव्हरी
जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले, "मी पुणेकरांना सांगू इच्छितो की घरगुती गॅस उपलब्ध आहे. प्रशासनाने व्यावसायिक गॅसवर बंदी आणली आहे. लोकांनी रांगा लावू नयेत. शहरात गॅसचा तुटवडा होणार नाही. नागरिकांना २५ दिवसांनी गॅस मिळत राहील. रुग्णालये आणि हॉस्टेलसाठी पुरेशा गॅस राखीव ठेवला आहे." तसेच, ब्लॅक मार्केटवर कारवाई करण्यासाठी पथक तयार आहेत. जास्त दरात गॅस विकल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच वितरकांवर देखील कारवाई होईल.
 
नागरिकांनी घाबरू नका
जिल्हाधिकारी डूडी यांनी नागरिकांना आवाहन केले, "ब्लॅक मार्केटबाबत तीन-चार जणांवर आधीच कारवाई झाली आहे. आता ब्लॅक मार्केटद्वारे गॅस देताना कोणी सापडल्यास गुन्हे दाखल होतील आणि गॅस जप्त केला जाईल. काही गॅस वितरकांना पोलीस बंदोबस्तही दिला आहे. नागरिकांनी गर्दी करू नये आणि घाबरू नका. येत्या एक-दोन दिवसात गॅसची होम डिलिव्हरी पूर्वीसारखी सुरू होईल."
 
या उपाययोजनांमुळे पुण्यातील घरगुती गॅस पुरवठा सुरळीत चालू राहणार असून नागरिकांना कोणतीही अडचण न होता गॅस मिळेल, असे प्रशासनाने आश्वासन दिले आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.