LPG Cylinder Booking : सध्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसत आहे. इराणने होर्मुझचा मार्ग अडवल्याने या जलमार्गाने होणारा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भारत सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचे उत्पादन आणि पुरवठा हा पूर्णतः घरगुती वापरासाठी देण्याचे निर्देश दिलेत. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात गॅस बुकिंगची विंडो २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस केली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. अनेकांना हा गॅस बुकिंग करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच ग्रॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. फोन कॉलच्या माध्यमातून गॅस बुक होत नसेल तर इतरही काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस बुकिंग करू शकता. हे मार्ग कोणकोणते आहेत, ते जाणून घ्या...
१) WhatsApp बुकिंग
जर फोन कॉलद्वारे बुकिंग होत नसेल, तर व्हॉट्सॲप हा एक उत्तम पर्याय आहे. अनेक एलपीजी पुरवठादारांनी आता त्यांच्या ग्राहकांना व्हॉट्सअपद्वारे थेट सिलेंडर बुक करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे, ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि सोपी होते. व्हॉट्सअपद्वारे बुक करण्यासाठी, ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबरवरून गॅस कंपनीच्या अधिकृत नंबरवर मेसेज पाठवा.
Indane कंपनी : 7588888824 वर “REFILL” असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवावा.
HP Gas कंपनी : 9222201122 या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर 'Hi' किंवा 'Book' असा मेसेज करू शकतात.
Bharat Gas कंपनी : 1800224344 या क्रमांकावर 'Hi' किंवा 'Book' असा व्हॉट्सॲप मेसेज करू शकतात.
मेसेज पाठवल्यानंतर सिस्टम तुमचे बुकिंग नोंदवते आणि काही क्षणात बुकिंग कन्फर्मेशनचा मेसेज पाठवते.
२) SMS बुकिंग
ग्राहक आपल्या नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबरवरून SMS पाठवूनही सिलिंडर बुक करू शकतात.
Indane कंपनी : नोंदणीकृत नंबरवरून 7718955555 वर 'REFILL' असा SMS पाठवा.
Bharat Gas : नोंदणीकृत नंबरवरून 7715012345 किंवा 7718012345 वर 'LPG' लिहून SMS करा.
३) मिस्ड कॉल देऊन करा बुकिंग
ग्राहक एक मिस्ड कॉल देऊन तुमचा सिलेंडर सहजपणे बुक करू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल दिल्यानंतर, तुमचे बुकिंग आपोआप रजिस्टर्ड होते आणि एक कन्फर्मेशन मेसेज पाठवला जातो. बुक करण्यासाठी, खालील क्रमांकांवर मिस्ड कॉल द्या. ही पद्धत विशेषतः मर्यादित इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे.
Indane कंपनी : 8454955555
Bharat Gas कंपनी : 7710955555
HP Gas कंपनी : 9493602222
४) मोबाइल ॲपद्वारे करा बुकिंग
जर वरीलपैकी कोणतीही पद्धत काम करत नसेल, तर तुम्ही UMANG ॲपसह Paytm, PhonePe, Amazon Pay यासारख्या पेमेंट ॲप्सवरूनही बुकिंग करण्याचा प्रयत्न करू शकता.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\