मुंबई :(Asiatic Society) दोन शतकांहून अधिक काळ मुंबईच्या सांस्कृतिक विश्वाचे केंद्र असलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक उद्या दि. १४ मार्च रोजी संपन्न होणार आहे. मागचे अनेक महिने ही निवडणूक चर्चेच्या आणि वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. अशातच आता, या निवडणूकीत नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे. राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वातील एशियाटि टुमारो या गटाचे १९ उमेदवार या निवडणूक उतरले आहे. दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या गटातील १३ उमेदवार यावेळी रिंगणात असून, अपक्ष गटातून ७ उमेदवार निवडणूकीत सामील झाल्यामुळे या तिरंगी लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे.
कशी पार पडणार निवडणूक?
१.सभासद सदस्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवून परिसरात प्रवेश करता येईल
२. अधिकृत सदस्य टोकन घेऊन मतदार यादी असलेल्या प्रवेशिकेत जातील
३. मतदार यादी क्रमांक असलेले टोकन घेऊन त्यांच्या नावावर स्वाक्षरी केल्यानंतर, ते दरबार हॉलमध्ये मतदानासाठी जातील.
४. एका वेळी, १० सदस्यांना कार्यालयात (पूर्व कक्ष) पाठवले जाईल.
५. दरबार हॉलमध्ये - मतदान क्षेत्रात, मतदाराचे टोकन गोळा केले जातील आणि त्यांच्या बोटांवर एक खूण केली जाईल
६. मतदार मतदार यादीतील त्यांच्या नावावर स्वाक्षरी करेल आणि मतपत्रिका गोळा करेल.
७. मतदाराला मतदानासाठी मतदान केंद्रावर पाठवले जाईल आणि नंतर तो/ती संबंधित मतपत्रिका संबंधित मतपेटींमध्ये टाकेल
८. मतदार दुसऱ्या दरवाजाने (बाहेर पडण्याच्या दरवाजाने) मतदान क्षेत्रातून (दरबार हॉल) बाहेर पडेल आणि टाउन हॉल वाचन क्षेत्रात पाठवले जाईल.
मतदारांसाठी महत्वाच्या सूचना!
१. एएसएमच्या (ASM) आवारात केवळ अधिकृत सदस्यांनाच प्रवेश दिला जाईल.
२. मतदानासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे (ASM) सदस्यत्व ओळखपत्र (ID Card) सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
३. ज्यांच्याकडे ओळखपत्र नसेल, त्यांना मतदानाच्या दिवशी कोणतेही 'डुप्लिकेट कार्ड' दिले जाणार नाही आणि अशा व्यक्तींना मतदान करता येणार नाही.
४. मतदानाच्या दिवशी एएसएम कंपाऊंड आणि इमारतीच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास सक्त मनाई आहे.
५. उमेदवारांना थांबण्यासाठी 'सेंट्रल लायब्ररी रीडिंग रूम' परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे.
६. सेंट्रल लायब्ररी रीडिंग रूम परिसरात कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ किंवा पेये नेण्यास परवानगी नाही.
७. मतदान क्षेत्राच्या (दरबार हॉल) आत मोबाईल फोन वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे.
८. सर्व सदस्यांनी निवडणुकीदरम्यान शिष्टाचार आणि अनुशासनाचे पालन करणे अपेक्षित आहे.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.