मुंबई : (US Israel Iran Conflict) मध्य पूर्वेत गेल्या १३ दिवसांपासून इराणविरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका असा संघर्ष सुरु आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाई लवकरच थांबवणार असल्याचे संकेत दिले असताना असताना आता इराणच्या अध्यक्षांनी देखील शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. पण, इस्त्रायल आणि अमेरिकेविरुद्धचे युद्ध थांबविण्यासाठी इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.(US Israel Iran Conflict)
रशिया, पाकिस्तानबरोबर शांतता चर्चा
इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर (पूर्वीचे द्विटर) शांतता चर्चेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुरु असलेल्या संघर्षावरुन रशिया आणि पाकिस्तानसोबत चर्चा झाल्याचे पेझेश्कियान यांनी नमूद करताना, हे युद्ध थांबविण्यासाठी इराणच्या अटी मान्य करणे हा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट केले.(US Israel Iran Conflict)
इराणने ठेवलेल्या तीन मुख्य अटी कोणत्या?
१) आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणच्या सार्वभौम हक्कांचा स्वीकार करणे.
२) युद्धादरम्यान झालेल्या हानीसाठी योग्य ती आर्थिक किंवा राजनैतिक नुकसानभरपाई देणे.
३) भविष्यात इराणवर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून ठोस सुरक्षा हमी देणे.