शिवम दुबे कौन है? वो क्रिकेटर?, टीसीने प्रश्न विचारताच शिवम दुबेच्या पत्नीनं दाखवलं प्रसंगावधान, नेमकं काय घडलं?
12-Mar-2026
Total Views |
मुंबई (Shivam Dube travelled Ahmedabad Mumbai Sayaji Express ) : “वो शिवम दुबे कौन है? क्रिकेटर?”, “वो यहाँ ट्रेनसे क्यू आएगा?”, हा संवाद आहे, प्रसिद्ध क्रिकेटपटू शिवम दुबेची पत्नी आणि तिकीट तपासनीस (टिसी) यांच्यातील संवाद! वरवर पाहता हा तुम्हाला सामान्य प्रवासी आणि टिसीतील संवाद वाटेल, मात्र, यावेळी जर तिकीट तपासनीसाने शहानिशा करण्यात वेळ दिला असता तर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच गोंधळ आणि गर्दी झाली असती. त्याचं झालं असं की, विश्वचषक टी-२० सामना संपवून सर्वच खेळाडू माघारी निघाले. मात्र, इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आणि एकाच वेळी मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आरक्षण फुल्ल होतं.
अशाच गोंधळात क्रिकेटपटू शिवम दुबेलाही मुंबईत परतण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्याने मुंबईकडे येणाऱ्या सयाजी नगरी एक्सप्रेसची एसी-३ टीअरची तिकीटे काढली. पण प्रवासादरम्यान क्रिकेट चाहत्यांनी ओळखल्यास आणि विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष लक्षात घेता प्रचंड गर्दी होण्याचीही शक्यता होती. धोका होताच मात्र, दोन्ही मुले मुंबईत असल्याने त्यांना भेटण्यासाठी दुबे दाम्पत्याने हा पर्याय निवडला.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “विमानतिकीट उपलब्ध नसल्याने अहमदाबादहून लवकर मुंबईला येण्याचा निर्णय दोघांनी घेतला. रस्ते मार्गे जाण्याचा पर्यायही उपलब्ध होता मात्र, ट्रेन अधिक सुरळीत पर्याय ठरणार होती. त्यामुळे शिवम दुबे, त्याची पत्नी आणि एका मित्रासोबत त्यांनी रेल्वेप्रवासाचा पर्याय निवडला. तिघांनीही थर्ड एसीचे आरक्षित तिकीट घेतले.”
रेल्वेत कुणी ओळखू नये म्हणून डोक्यावर कॅप, मास्क आणि पूर्ण हाताचे टी-शर्ट घातले होते. ट्रेनमध्ये बसल्यावर तो सरळ वरच्या बर्थवर जाऊन बसला. आपली ओळख लपवण्यासाठी रेल्वेने दिलेल्या ब्लँकेट ओढून घेतले. ही गोष्ट आम्ही ज्या ज्या मित्रांना सांगितले ते सर्वच चिंतेत होते. जर तिथे कुणी आम्हाला ओळखले असते तर काय होईल, याची चिंता त्यांना होती.
सकाळी ५.१० वाजताची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी नसेल, असे शुभमने पत्नीला समजावले. ट्रेन सुटण्यापूर्वी पाच मिनिटे मी कारमध्ये थांबेन मात्र, नंतर पटकन ट्रेन पकडेन, अशी युक्ती त्याने सांगितली. सारंकाही नियोजनानुसारच झालं. ट्रेनमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) आला तेव्हा त्याने विचारले, “शिवम दुबे? वो कौन है, क्रिकेटर?” तेव्हा दुबे यांच्या पत्नीने लगेच उत्तर दिले, “नाही नाही, तो इथे कुठून येणार?” असा संवाद झाल्यानंतर टीसी पुढे निघून गेला. पूर्ण प्रवासादरम्यान त्याला कुणीच ओळखले नाही.
मुंबईत उतरल्यानंतर त्याने बाहेर जाण्यासाठी पोलीसांची मदत घेतली. पोलीसांना वाटले की, शुभम विमामाने येईल. मात्र, ट्रेनने येत असल्याचे पाहून पोलीसांनाही धक्का बसला. पोलीसांनी त्याला एस्कॉट केल्याने ते सुखरूप घरी पोहोचला.
टी-२० विश्वचषकाच्या सामान्यात आठ चेंडूत नाबाद २६ धावा करत त्याने भारताची धावसंख्या २५०च्या पुढे नेण्यास मदत केली होती. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा ९६ धावांनी पराभव झाला होता. यंदाच्या विश्वचषकात दुबेने आठ डावांमध्ये एकूण २३५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १६९.०६ इतका होता.
विश्वषकच जिंकल्यानंतर त्याने आपल्या वडिलांसोबतचा भावनिक क्षण शेअर केला आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या शिवम दुबेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने आपल्या वडिलांना विश्वचषक जिंकल्यानंतरचे मेडल परिधान घातल्याचे दिसत आहे. त्याचा हा अंदाज क्रिकेट रसिकांना भावला. त्याच्या वडिलांनी टीम इंडियाची ब्लू जर्सी परिधान केली आहे. व्हिडिओत शिवम आपल्या वडिलांना मेडल घालून त्यांचा सन्मान करताना दिसत आहे. त्या व्हिडिओला रिअल हिरो, अशी कॅप्शनही दिली आहे.
आपल्या वयाच्या पाच वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे शिवम दुबे. शिवम दुबेचे वडिल राजेश दुबे यांचंही क्रिकेटशी नातं आहे. राजेश हे पूर्वी एक पहलवानही होते. त्यानंतर त्यांनी डेअरीचा व्यावसाय केला. २००६मध्ये त्यांनी जिन्सचा व्यापार केला. त्यानंतर तो ठप्प झाला. या काळात शिवम दुबेला पाच वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागले. यामुळेच अंडर 19 भारतीय संघात तो खेळू शकला नाही. मात्र, त्यानंतर कमबॅक केला आणि आता तो विश्वविजेत्या संघाचा भाग बनला आहे.
यंदाच्या विश्वचषकात शिवमने एकूण नऊ मॅच खेळल्या होत्या. ज्यात आठ वेळा बॅटींग करत २३५ धावा ठोकल्या होत्या. तसेच पाच विकेटही घेतले आहेत. भारतासाठी एकूण ६४ आंतरराष्ट्रीय मॅच ९९१ धावा केल्या आहेत, त्याच्या नावे एकूण ३१ विकेटचा रेकॉर्ड आहे.