मुंबई: (Pushkar Singh Dhami) मदरसे दहशतवादाची फॅक्टरी असून राज्यात त्यांना बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सनातन संस्कृतीशी छेडछाड सहन केली जाणार नाही," असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट शब्दांत सांगितले. मुख्यमंत्री धामी यांनी सरकारच्या कामगिरी, धोरणे आणि भविष्यातील योजनांचा सविस्तर आढावा मांडला. त्यांनी सांगितले की राज्य सरकार “विकल्प रहित संकल्प” या ध्येयाने उत्तराखंडला समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर राज्य बनवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. (Pushkar Singh Dhami)
समान नागरी संहितेचा उल्लेख करत ते म्हणाले, राज्य सरकारने अनेक ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेतले आहेत. समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे. या कायद्यामुळे महिलांना समान अधिकार मिळाले असून समाजात समता आणि न्यायाची भावना बळकट झाली आहे. राज्याची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी सरकारने कठोर भू-कायदा आणि धर्मांतरविरोधी कायदेही लागू केले आहेत. (Pushkar Singh Dhami)
विधानसभेतील भाषणातून धामी यांनी विरोधकांसह प्रशासकीय यंत्रणेलाही स्पष्ट संदेश दिला की सरकार सनातन आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार आहे. देवभूमीचा सांस्कृतिक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल. मदरसांमध्ये कट्टरपंथी आणि शेकडो वर्षे जुनी शिक्षणपद्धती शिकवली जाणार नाही. ‘थूक जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या मानसिकतेला सरकार सहन करणार नाही. धर्मांतरविरोधी कायदे आणि दंगल विरोधी कायदे देवभूमीसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित उत्तराखंड निर्माण करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. (Pushkar Singh Dhami)
राज्यात होत असलेल्या लोकसंख्यात्मक बदलांवर बोलताना त्यांनी सांगितले की, घुसखोरांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करू दिले जाणार नाही. आतापर्यंत १२ हजार एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून ही मोहीम पुढेही सुरू राहील. या अतिक्रमणासाठी त्यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाला जबाबदार धरले. (Pushkar Singh Dhami)
अवैध मजारांवर कारवाई
धामी यांनी अवैध मजारांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले काँग्रेसच्या काळात सरकारी जमिनीवर ‘लँड जिहाद’ची मानसिकता वाढू दिली गेली. त्याविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहील. तसेच मानसखंड आणि केदारखंडातील मंदिरांच्या संवर्धनाचे काम, यमुना घाटाचे बांधकाम आणि भविष्यातील भव्य कुंभमेळ्याची तयारीही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Pushkar Singh Dhami)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक