Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुरक्षित...

12 Mar 2026 18:32:51
 
Devendra Fadnavis
 
मुंबई: (Devendra Fadnavis) "मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. राऊतांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. विधानभवनाबद्दल धमकी आणि ज्या कोणी अफवा पसरवण्याचे काम केले त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मात्र ‘मुंबई सुरक्षित नाही’ अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचे काम नियोजनबद्ध रितीने राऊत यांच्यामार्फत केले जात आहे. "असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवार दि.१२ रोजी केला. (Devendra Fadnavis)
 
"जेव्हापासून केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तेव्हापासून मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकले नाही. तत्कालिन मविआ सरकारचे गृहमंत्री शंभर कोटींची वसुली कशी करत होते हे राऊतांनी आठवावे आणि मग इतरांवर टीका करावी."असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. (Devendra Fadnavis)
 
स्वतः सालगडी असणा-या राऊतांनी साला या शब्दावर आक्षेप घेणे म्हणजे विनोद आहे असा टोमणा बन यांनी लगावला. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा: Mumbai bomb threat : धमकीचा मेल; मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क! विधानभवन, मेट्रो आणि शेअर बाजारासह ४ ठिकाणांवर मिसाईल हल्ल्याची धमकी 
 
" काँग्रेसला देशाची आणि भारतीयांची काळजी नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कॉमेडी सर्कस सुरू असून या सर्कसमध्ये मनोरंजनासाठी विदूषक म्हणून संजय राऊतांना चाकरीला ठेवले आहे.इराण इस्राएल युद्धाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करतात या भानगडीत राऊतांनी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून आखाती देशांतील युद्धाच्या स्थितीतही सुरक्षित आहे. पंतप्रधान काय करतात हे आत्ता युद्धजन्य स्थितीत दिसून आले पण हे समजण्याएवढी राऊतांची बौद्धीक कुवत नाही. जगातील भल्या भल्या देशांना युद्धाची झळ बसली असताना भारत देश आणि भारतीय निश्चिंत आणि सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सातत्याने बैठका घेतात, युद्धस्थितीत भारताला कमितकमी झळ बसावी यासाठी उपाययोजना करत आहेत. घरात बसून फेसबुक लाईव्ह करणा-यांना याचे मोल कळणार नाही." असा टोला त्यांनी लगावला. (Devendra Fadnavis)
 
"अफजलखान, औरंगजेबाचा उदो उदो करण्यात धन्यता मानणा-या राऊतांना, उबाठा गटाला ‘जय श्री राम’ घोषणेचे महत्व कळणार नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. ‘जय श्री राम’ चे नामस्मरण करण्यास तुम्हाला लाज वाटत असेल आम्हाला मन:शांती आणि आनंद मिळतो. ‘जय श्री राम’ चा संबंध गॅस सिलेंडर पुरवठा करण्याशी जोडून राऊतांनी वैचारिक आणि बौद्धीक पातळी किती खालावली आहे हे दाखवून दिले आहे. देशाचे संरक्षण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत त्याची चिंता राऊतांनी करूच नये." असेही त्यांनी खडसावले. (Devendra Fadnavis)
 
Powered By Sangraha 9.0