मुंबई : (Women Farmers) विधान भवन मुंबई येथे ‘महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या महिला शेतकरी व संस्थांचा आज गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. (Women Farmers)
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहून राज्यातील विविध भागांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान केला. (Women Farmers)
कार्यक्रमात सन्मानित महिलांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करण्यात आले. (Women Farmers)
हेही वाचा: सामान्यातून असामान्यतेकडे...
सन्मानित महिला शेतकरी (Women Farmers)
भूमिका शिर्के – कोकण विभाग
स्वाती शिंगाडे – पुणे विभाग
अरुंधती पाटील – कोल्हापूर विभाग
वृंदावनी यादव – लातूर विभाग
गंगुबाई ठेंग – अमरावती विभाग
नेहा शेट्ये – रत्नागिरी जिल्हा
मयुरी जाधव – रत्नागिरी जिल्हा
सन्मानित संस्था (Women Farmers)
मराठवऱ्हाड दूध उत्पादक संघ – नागपूर (रुपाली शिंदे व वर्षा चव्हाण)
या चर्चासत्रातून महिला शेतकऱ्यांचे योगदान, आधुनिक शेतीतील त्यांची भूमिका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे वाढते नेतृत्व यावरही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हे राज्याच्या कृषी विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. (Women Farmers)