मुंबई : (India Alliance) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी आता राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी इंडिया आघाडीमधील नेत्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. (India Alliance)
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, संसद अधिवेशनात या अपघाताच्या पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात येणार असून त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून पाठपुरावा सुरू आहे. काँग्रेससह इतर सहयोगी पक्षही या मागणीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (India Alliance)
संसदेत चर्चा रोखल्याचा आरोप... (India Alliance)
रोहित पवार यांनी असेही सांगितले की, अरविंद सावंत यांनी संसदेत स्थगन प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना बोलू दिले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला. (India Alliance)
त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, राज्याच्या विधिमंडळात जशी चर्चा होऊ दिली जात नाही, त्याचप्रमाणे संसदेतही या मुद्द्यावर कुठेतरी अडथळे आणले जात आहेत का? (India Alliance)
सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय? (India Alliance)
संसदेच्या अधिवेशनात अजित दादांच्या अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी खा. सुप्रियाताईंच्या मदतीने आम्ही इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा करत आहोत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष हे पारदर्शक चौकशीची मागणी करणार आहेत. (India Alliance)
मराठी स्वाभिमान जपणाऱ्या मा.उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडून खा.अरविंद सावंत साहेबांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बोलू दिले गेले नाही. हे पाहता, ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळात चर्चा होऊ दिली जात नाही त्याचप्रकारे संसदेत देखील चर्चेला कुठेतरी अडथळे आणले जात आहेत का ? असा प्रश्न पडतो. असो कितीही अडथळे आणले तरी दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही हे मात्र नक्की! (India Alliance)