LPG Gas Booking Process : गॅस एजन्सीच्या रांगेत वेळ वाया न घालवता! घरबसल्या WhatsApp वर ‘Hi’ पाठवून LPG सिलेंडर बुक करा

    11-Mar-2026   
Total Views |
LPG Gas Booking Process 
 
मुंबई : (LPG Gas Booking Process) मध्यम पूर्वमधील युद्धामुळे भारतात घरगुती गॅस पुरवठ्यावर ताण आलेला आहे. इराण-इजराइल आणि अमेरिकेतील संघर्षामुळे हॉर्मुज जलमार्ग बंद झाला असून, याचा थेट परिणाम गॅस सप्लाईवर झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये गॅस एजन्सींमध्ये सिलेंडर मिळवण्यास समस्या येत आहे.. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६0 रुपयांनी वाढ केली असून, बुकिंग पीरियड २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत वाढवले आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये हॉटेल व फॅक्ट्र्यांच्या (कॉमर्शियल) गॅस पुरवठ्यावर सध्या ब्रेक देण्यात आला आहे, ज्यामुळे घरगुती वापरासाठी गॅस मिळण्यास अडचण होणार नाही.
 
घरबसल्या LPG सिलेंडर कसा बुक करावा
सिलेंडर कमी झाल्यास एजन्सींवर गर्दी होते, ज्यामुळे गर्दीत जाणे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल, किंवा मोबाईल अ‍ॅप वापरणे सोयीचे ठरते.

इंडेन गॅस (Indane Gas)
  • व्हॉट्सअ‍ॅप: ७५८८८ ८८८२४ वर 'REFILL' टाईप करून पाठवा.
  • मिस्ड कॉल: ८४५४९ ५५५५५ वर मिस्ड कॉल द्या.
  • IVRS/एसएमएस: ७७१८९ ५५५५५ वर कॉल किंवा मेसेज करूनही बुक करता येईल.
HP गॅस (HP Gas)
  • व्हॉट्सअ‍ॅप: ९२२२२ ०११२२ सेव करून 'Hi' पाठवा.
  • मिस्ड कॉल: ९४९३६ ०२२२२ वर मिस्ड कॉल.
  • अ‍ॅप : 'HP Pay' अ‍ॅप किंवा Amazon/Paytm वरून पेमेंटसह बुकिंग करा.
भारत गॅस (Bharat Gas)
  • व्हॉट्सअ‍ॅप: १८००२२४३४४ वर 'Hi' पाठवा.
  • IVRS: ७७१५०१२३४५ किंवा ७७१८०१२३४५ वर कॉल करा.
  • एसएमएस: 'LPG' ७७१५०१२३४५ वर पाठवा.
सिलेंडर लवकर मिळवण्याचे मार्ग
२५ दिवसांचा नवीन बुकिंग पीरियड लागू असल्यामुळे, कोटा खुलताच तत्काळ ऑनलाइन बुकिंग करा. व्हॉट्सअ‍ॅप किंवा अ‍ॅपवरून बुकिंग केल्यास लगेच बुकिंग रेफरन्स नंबर मिळतो, ज्यामुळे डिलिव्हरी ट्रॅक करणे सोपे होते.
जर आपला मोबाइल नंबर एजन्सीमध्ये रजिस्टर केलेला नसेल, तर प्रथम आपल्या एजन्सीकडे जाऊन किंवा IVRS द्वारे अपडेट करा. यामुळे तुम्ही घरबसल्या बुकिंगची सुविधा पूर्णपणे वापरू शकाल.
 
घरबसल्या बुकिंगचे फायदे
  • एजन्सीच्या रांगेत उभे राहणे् टाळता येते.
  • बुकिंग लगेच होत असल्याने सिलेंडर पटकन मिळतो.
  • पेमेंट व बुकिंग एकाच ठिकाणी करता येते.
या सोप्या उपायांनी, आता तुम्हाला सिलेंडरसाठी बाहेर धावपळ करावी लागत नाही, आणि घरगुती स्वयंपाक सुरळीत चालू राहतो.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.