१३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

11 Mar 2026 16:13:28
Harish Rana
 
नवी दिल्ली : (Harish Rana) १३ वर्ष बेडला खिळून पडलेला रुग्ण हरीश राणा याला इच्छामरणाची परवानगी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. न्या. जेबी पारदीवाला आणि न्या. के वी विश्वनाथन यांच्या खंडपाठाने हा निर्णय सुनावला. या प्रकरणात कोर्टाने एम्सचा रिपोर्ट मागवला होता. त्यात हरीश राणा याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोर्टाने हरीश राणा यांच्या इच्छामरणाला परवानगी दिली. हरीशच्या आई वडिलांनी मुलाला इच्छामरण द्यावे म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. मागील १३ वर्षापासून हरीश बेडला खिळला होता.
 
हेही वाचा : १०.६० लाख सदस्यांसह विद्या भारती माजी विद्यार्थी परिषद जगात अव्वल!
 
अखेर सुप्रीम कोर्टाने १३ वर्षापासून कोमात असलेल्या गाझियाबादच्या हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी दिली. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने त्याच्या घरच्यांसोबत संवाद साधला होता. १०० टक्के दिव्यांग असलेला मुलगा पुन्हा ठीक होण्याची आशा आई वडिलांनी सोडली होती. त्यामुळेच मुलाला या त्रासातून मुक्त करावे ही मागणी करत आई वडिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून त्याला इच्छामरण द्यावे अशी मागणी केली होती. आई वडिलांशी संवाद साधल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल मागवला. आज हा अहवाल कोर्टासमोर सादर करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
 
 
Powered By Sangraha 9.0