मुंबई : (LPG Crisis) मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील काही भागांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सहित तेल कंपन्यांनी सध्या घरगुती ग्राहकांना प्राधान्य देत कमर्शियल सिलेंडरचे रिफिलिंग थांबवले असल्याचे माध्यमांवरून सांगितले जात आहे. (LPG Crisis)
गोडाऊन आणि डिलर पातळीवर व्यावसायिक सिलेंडरचे वितरण १०० टक्के कायमचे बंद नसून तात्पुरते थांबवण्यात आले आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (LPG Crisis)
हॉटेल आणि उद्योगांवर परिणाम... (LPG Crisis)
काही शहरांमध्ये डिलर्सना व्यावसायिक सिलेंडरचे वितरण पूर्णपणे थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने हॉटेल्स, केटरिंग व्यवसाय आणि औद्योगिक युनिट्स अडचणीत आले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी गॅस उपलब्ध नसल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार केली आहे. (LPG Crisis)
युद्धाचा पुरवठ्यावर परिणाम... (LPG Crisis)
इस्त्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आखाती देशांतील रिफायनरींवर हल्ले आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर घरगुती ग्राहकांना आधी गॅस उपलब्ध व्हावा यासाठी तेल कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडरचे भरणे तात्पुरते थांबवले असल्याचे सांगितले जात आहे. (LPG Crisis)
छापेमारी आणि काळाबाजारावर कारवाई... (LPG Crisis)
काही भागांमध्ये काळाबाजार आणि अवैध गोडाऊनवर छापेमारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात नियमबाह्य साठे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे काही गोडाऊन प्रत्यक्षात पूर्णपणे बंद पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (LPG Crisis)
तज्ज्ञांच्या मते, जर जागतिक परिस्थिती लवकर स्थिर झाली नाही तर खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्याचा शेती आणि अन्न उत्पादनावर परिणाम होऊन किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणार नसल्याचे सांगितले आहे. तथापि, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. (LPG Crisis)