मुंबई : (LPG Theft) विधानसभेत बुधवार दि. ११ मार्च रोजी एक मोठा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी १८ लाख रुपयांच्या एलपीजी सिलेंडर चोरीचा गंभीर दावा केला. सध्या देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना, उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेचा उल्लेख करत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (LPG Theft)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील झाशी येथे ६ मार्च रोजी ५२४ एलपीजी सिलेंडरने भरलेला ट्रक चोरीला गेला. या सिलेंडरची एकूण किंमत सुमारे १७ ते १८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना भारत पेट्रोलियमच्या करारी येथील प्लांटशी संबंधित आहे. येथून ट्रक क्रमांक UP 93 BT 3341 मध्ये सिलेंडर भरून तो गजनेर, कानपूर देहात येथे पाठवला जात होता. मात्र होळीच्या सुट्ट्यांमुळे ट्रक प्लांटबाहेर उभा असताना चालक घरी गेला होता. (LPG Theft)
दरम्यान, ६ मार्च रोजी रात्री १:०७ वाजता अज्ञात चोरट्यांनी ट्रक घेऊन पळ काढला. आरोपींनी ट्रकचा GPS देखील तोडून टाकला, त्यामुळे वाहनाचे लोकेशन ट्रॅक करता आले नाही. नंतर पोलिसांना शेवटचे GPS लोकेशन सापडल्यानंतर ट्रक रिकामा अवस्थेत आढळला. ट्रकमधील सर्व ५२४ गॅस सिलिंडर गायब असल्याचे समोर आले. (LPG Theft)
या प्रकरणी ट्रक मालक नीरज कुमार अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सिप्री बाजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी चंद्रदेव यादव यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. पोलिस आता या चोरीमागील टोळीचा शोध घेत आहेत. (LPG Theft)