नवी दिल्ली : (India At UN Security Council) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी सीमेपलीकडील दहशतवाद आणि अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यांवरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्यांच्या 'इस्लामी एकते'च्या गप्पा कशा खोट्या आहेत, याचा पर्दाफाश भारताने केला आहे.(India At UN Security Council)
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या सनदांचे आणि अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले. पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये १८५ नागरिकांचा, त्यातही अनेक महिला आणि मुलांचा मृत्यू झाल्याचे भारताने अधोरेखित केले.(India At UN Security Council)
अफगाणिस्तानविरुद्ध व्यापारमार्गांचे शस्त्रीकरण केल्याबद्दलही भारताने पाकिस्तानला धारेवर धरले. यासोबतच पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना म्हणून लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि टीआरएफ यांच्या नावाचा पुनरुच्चार केला.(India At UN Security Council)