Sanjay Raut Press Conference: इराण- इस्त्रायल युद्धावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर तीव्र टीका! म्हणाले, ‘मोदी सरकारची ही शांतता म्हणजे...’

10 Mar 2026 13:02:59


 
Sanjay Raut Press Conference
 
दिल्ली : (Sanjay Raut Press Conference) मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंगळवार, १० मार्च रोजी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इराण–इस्त्रायल–अमेरिका संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. (Sanjay Raut Press Conference)
 
राऊत म्हणाले की, हे युद्ध जरी मध्यपूर्वेत सुरू असले तरी त्याच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचल्या आहेत. महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, निर्यातीत अडथळे आणि शेतकऱ्यांचे नुकसान या सर्व समस्यांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. (Sanjay Raut Press Conference)
 
त्यांनी पुढे सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतातून विविध देशांकडे जाणारा कृषी माल बंदरांवर अडकून पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, या जागतिक घडामोडींमध्ये भारताची नेमकी भूमिका काय आहे यावर संसदेत सविस्तर चर्चा व्हायला हवी. (Sanjay Raut Press Conference)
 
हेही वाचा: शांततेचा राजमार्ग  
 
राऊत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांदी यांचा उल्लेख करत सांगितले की, सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा टाळायची आहे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी काही महत्त्वाची माहिती विरोधी पक्षाकडे आहे आणि त्यावर सरकारकडे उत्तर नाही. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत शांततेच्या बाजूने असल्याचे सांगितले होते. मात्र यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “जर हीच शांतता असेल तर ती हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत ‘षंढांची शांतता’ म्हणावी लागेल.” (Sanjay Raut Press Conference)
 
राऊत यांनी पुढे दावा केला की, भारताच्या सागरी हद्दीत अमेरिकेने कारवाई करत इराणचे जहाज बुडवले असून त्यात अनेक नौसैनिकांचा मृत्यू झाला. तसेच त्यांनी असा आरोपही केला की, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर भारताने अजूनपर्यंत अधिकृत शोक व्यक्त केलेला नाही. “इराण हा भारताचा जुना मित्र देश आहे. अशा वेळी त्याच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त न करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे,” असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut Press Conference)
 

 
Powered By Sangraha 9.0