मुंबई : (Donald Trump Warn Iran) अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या समुद्र मार्गातून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न जर केला तर अमेरिका इराणवर अत्यंत कठोर कारवाई करेल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.(Donald Trump Warn Iran)
काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जर इराणने या जलमार्गात अडथळा निर्माण केला, तर अमेरिका त्यांच्याविरोधातील लष्करी कारवाई आणखी तीव्र करेल असा थेट इशारा दिला आहे. "जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाची वाहतूक रोखण्यासाठी काहीही कृत्य केले, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत वीस पटीने अधिक जोरदार हल्ला करेल. याशिवाय, आम्ही अशा सहजपणे उद्ध्वस्त करता येणारे लक्ष्य नष्ट करू, ज्यामुळे इराणला एक राष्ट्र म्हणून पुन्हा उभे राहणे अक्षरशः अशक्य होईल", अशी धमकीही ट्रम्प यांनी या सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे.(Donald Trump Warn Iran)
ट्रम्प यांनी हेही नमूद केले की, होर्मुझ सामुद्रधुनीमधून समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीचा मार्ग सुरू राहिल्याचा, ऊर्जा पुरवठ्यासाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या देशांचा फायदा होईल. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी साधारणपणे पाचवा हिस्सा तेलाची वाहतूक याच जलमार्गातून होते, त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे ग्लोबल शिपिंग आणि ऊर्जा बाजारपेठा मोठा धक्का बसलेला असताना ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.(Donald Trump Warn Iran)