लखनौ ( उत्तर प्रदेश) : (Khamenei death Lucknow protest) अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये हजारो कट्टरतावादी लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी निदर्शने सुरू केली, यावेळी या आंदोलनांमध्ये कट्टरतावादी महिलाही सहभागी झाल्या होत्या. या कट्टरतावादी महिला छाती बडवून रडत होत्या. कट्टरतावादी निदर्शकांनी खामेनी जिंदाबाद आणि अमेरिका-इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
कट्टरतावादी महिलांचा आक्रोश
लखनौमधील आंदोलनात सहभागी झालेल्या एका कट्टरतावादी महिलेने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ज्यांच्या वंशात फसवणूक आणि गद्दारी आहे. त्यांनी खामेनींना फसवून मारले. खामेनी माझा सिंह होता, तो कयामतपर्यंत (प्रलयापर्यंत) राहील. एक खामेनी मरेल, पण हजार खामेनी जन्माला येतील. अमेरिका आणि इस्रायलचा धिक्कार असो. त्यांचे वंश गद्दार-फसवणूक करणारे आहेत.” या वक्तव्यादरम्यान अनेक कट्टरतावादी महिला रडत होत्या. काहींनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदवला. आंदोलनस्थळी वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते.
घंटाघर परिसरात निदर्शने
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर लखनौ येथे कट्टरतावाद्यांकडून निदर्शने करण्यात आली. ऐतिहासिक बडा इमामबाडा परिसरात तसेच घंटाघर भागात मोठी गर्दी जमली होती. कट्टरतावादी पुरुष, महिला आणि लहान मुलांनीही आंदोलनात सहभाग घेतला. कट्टरतावादी निदर्शकांनी शोक व्यक्त करत अमेरिका आणि इस्रायलविरोधात घोषणाबाजी केली. “अमेरिका मुर्दाबाद” आणि “इस्रायल मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासन सतर्क आहे.
तीन दिवसांचा शोक जाहीर
ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड यांनी खामेनी यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शोक जाहीर केला आहे. बोर्डचे महासचिव मौलाना यासूब अब्बास यांनी सांगितले की, लोक आपापल्या घरांवर काळे झेंडे लावतील आणि काळे कपडे घालतील. अयातुल्ला खामेनी यांच्या नावाने मजलिसचे आयोजन केले जाईल.
आखाती देशांकडे जाणारी विमाने रद्द
या घडामोडींमुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. लखनौहून सौदी अरेबियाकडे जाणारी सर्व विमाने तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत. दुबई आणि रियादकडे जाणारी प्रत्येकी दोन विमाने, तर मस्कट, अबू धाबी, दम्माम आणि शारजाहकडे जाणारी प्रत्येकी एक विमान रद्द करण्यात आले आहे.
तसेच, वाराणसी विमानतळावरून दुबईकडे जाणारी दोन विमाने ४ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.