Protests in Srinagar: खामेनीच्या मृत्यूवर इराणच्या नागरिकांचा जल्लोष! भारतात मात्र, कट्टरपंथींनी फोडला टाहो...

01 Mar 2026 16:29:50


 
Protests in Srinagar
 
मुंबई : (Protests in Srinagar) मध्यपूर्वेत तणावाने पुन्हा एकदा भीषण स्वरूप धारण केले आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्त्राइल यांनी इराणवर संयुक्त हवाई हल्ले केल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. महत्त्वाचे म्हणजे या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनीच्या मृत्यूनंतर इराणमधील अनेक नागरिकांनी रस्त्यांवर उतरून जल्लोष केला, फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. भारतात मात्र, कश्मीर, लखनऊसह अनेक ठिकाणी कट्टरपंथींकडून शोक सभा, मार्च आणि विरोध प्रदर्शन केले जात आहे. (Protests in Srinagar)
 
हेही वाचा :  Protests in Srinagar : खामेनींच्या मृत्युचा काश्मीरमधील कट्टरतावाद्यांना पुळका!

 
इराणमधील तेहरान, कराज आणि शिराजसारख्या शहरांमध्ये काही नागरिक रस्त्यावर उतरत, फटाके फोडत, नाचत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करत असल्याचे अनेक व्हिडिओस सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. इराणी नागरिक अमेरिका-इस्रायलला पाठिंबा देताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओसमध्ये "ट्रम्प जिंकू दे, आम्हाला मुक्ती मिळेल" अशा आशयाच्या घोषणा दिल्याचे दिसते. दशकभराच्या दडपशाहीमुळे आणि गेल्या अनेक वर्षांतील निर्बंध, आर्थिक संकट आणि अंतर्गत असंतोष यामुळे काही घटकांमध्ये असंतोष वाढला होता. त्यामुळेच या घटनेनंतर इराणमधील काही भागांत हा जल्लोष, आनंद व्यक्त होत असल्याचे माध्यमांवरून सांगितले जात आहे. (Protests in Srinagar)
 






View this post on Instagram
















A post shared by Woke_Kashmiri (@woke_kashmiri)


दुसरीकडे भारतातील काही शहरांमध्ये शोकसभा आणि निदर्शने आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. श्रीनगरच्या लाल चौकात कट्टरपंथींनी अमेरिका-इस्रायल विरोधात घोषणाबाजी करत, मर्सिया पठण केले आहे. लखनऊमध्ये शोकसभा, कॅंडल मार्च आणि दुकाने बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यासोबतच, कर्नाटक आणि कारगिलसह इतर काही भागांतही कट्टरपंथींकडून प्रतिक्रिया उमटत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (Protests in Srinagar)
 






View this post on Instagram
















A post shared by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)



 

Powered By Sangraha 9.0