Ayatollah Ali Khamenei Death: धक्कादायक! इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी हल्ल्यात ठार...,४० दिवसांचा दुखवटा जाहीर

01 Mar 2026 11:44:50
 
Ayatollah Ali Khamenei Death
 
तेहरान : (Ayatollah Ali Khamenei Death) अमेरिका–इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांनंतर इराणमधून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात खामेनी “शहीद” झाल्याचे म्हटले असून देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. (Ayatollah Ali Khamenei Death)
 
हल्ल्यावेळी ते त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात उपस्थित असल्याचे माध्यमांवरून समजत आहे. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालय परिसरावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले झाल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे. त्या भागावर अनेक अचूक मार्गदर्शित बॉम्ब टाकण्यात आले. उपग्रह चित्रांमध्ये परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. (Ayatollah Ali Khamenei Death) 
 
यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी खामेनी यांच्या मृत्यूचा दावा केला होता; मात्र अधिकृत पुष्टी नव्हती. अखेर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) अंतर्गत येणाऱ्या प्रेस टीव्हीने औपचारिक घोषणा केली आहे. (Ayatollah Ali Khamenei Death)
 
१९८९ पासून सत्तेवर असलेले खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत अमेरिकेशी संघर्ष, अणुकार्यक्रमावरील वाद, निर्बंध आणि प्रादेशिक तणाव यामुळे इराण जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. (Ayatollah Ali Khamenei Death)
 
या घडामोडींमुळे इराणमध्ये सत्तांतराची प्रक्रिया सुरू होणार का, याबाबत चर्चा रंगली आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला असून जागतिक बाजारपेठा, तेलदर आणि सुरक्षा व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरातील नेते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Ayatollah Ali Khamenei Death)
 
 
Powered By Sangraha 9.0