Israel Vs Iran War: मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी की जागतिक आर्थिक वादळाची चाहूल? इराणवर हल्ल्यांमागचे कारण आणि भारतावर होणारा परिणाम...

01 Mar 2026 18:54:05
 
Israel Vs Iran War
 
मुंबई: (Israel Vs Iran War) मध्यपूर्वेतील तणाव आता धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्त्राइल यांच्या संयुक्त कारवाईनंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. या संघर्षात आतापर्यंत २०० हून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू आणि ८०० पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणमधील सुमारे ३० ठिकाणांवर हल्ले केल्याचे सांगितले जात आहे, ज्यात अनेक लष्करी तळांचा समावेश आहे. (Israel Vs Iran War)
 
इराणवरील हल्ल्याचे नेमके कारण काय?
 
२०२५ मध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढत गेला. इस्रायलने जानेवारी महिन्यात इराणला स्पष्ट इशारा दिला होता की त्यांचा अणु कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतेचा विस्तार रोखला नाही, तर कठोर कारवाई केली जाईल. इस्रायलचे म्हणणे आहे की इराणची वाढती अणु क्षमता आणि प्रादेशिक सशस्त्र गटांना दिला जाणारा पाठिंबा त्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. (Israel Vs Iran War)
 
इराणने मात्र आपला अणु कार्यक्रम शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचे सांगत तो सुरूच ठेवला. अनेक इशाऱ्यांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने इस्त्राइलकडून तेहरानसह विविध ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (Israel Vs Iran War)
 
हेही वाचा: Khamenei death Lucknow protest : खामेनींचा मृत्यू: लखनौमध्ये कट्टरतावादी महिला छाती बडवून रडल्या, ‘मेरे खामेनी को धोखे से मारा’ म्हणत केलं आंदोलन  
 
संघर्ष वाढल्यास अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम?
 
इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकले तर तेलपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढल्यास जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो. (Israel Vs Iran War)
 
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यास भारतासारख्या आयात-आधारित देशांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता निर्माण होईल. महागाई वाढण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. येत्या काही आठवड्यांत भांडवली बाजारात मोठी चढ-उतार दिसू शकतात. युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती ऐतिहासिक पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Israel Vs Iran War)
 
पुढे काय?
 
जर संघर्ष मर्यादित राहिला, तर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. मात्र व्यापक युद्धात रूपांतर झाले, तर त्याचे परिणाम केवळ मध्यपूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगावर उमटतील. ऊर्जा दर, व्यापारमार्ग, आर्थिक स्थैर्य आणि भूराजकीय समीकरणे – सर्वच गोष्टींवर या संघर्षाची छाया पडू शकते. सध्या जगभरातील देश परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी काही दिवस मध्यपूर्वेसह जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. (Israel Vs Iran War)
 
 
Powered By Sangraha 9.0