Thane Municipal Corporation : ठाणे महानगरपालिका विरोधी पक्ष नेता कोण होणार?
09-Feb-2026
Total Views |
ठाणे : (Thane Municipal Corporation) ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) महायुतीचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले, यानंतर सभागृहात विरोधी पक्षनेते पद कोण भूषवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पदासाठी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन राष्ट्रवादी पक्षाचा विरोधी पक्ष नेता बसेल, असे बोलले जात आहे, यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या मनोज प्रधान कि नजीब मुल्ला हि दोन नावे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.(Thane Municipal Corporation)
ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) विरोधी पक्ष नेता पदाकरिता मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु झाली आहे, या पदाकरिता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मनोज प्रधान तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नजीब मुल्ला यांचे नाव आघाडीवर आहे. पण याकरिता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाराच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, परंतु स्थानिक पातळीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.(Thane Municipal Corporation)
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील नजीब मुल्ला ह्यांनी आव्हाड याना तीव्र विरोध करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विधानसभेला उभे राहून पराभव स्वीकारला होता, त्यानंतर थेट हे दोन्ही नेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या ठाण्यात अस्ति दर्शनावेळी गळा भेट झालेली नागरिकांनी पहिली होती, यामुळे ठाणे महानगरपालिका विरोधी पक्ष नेता नजीब मुल्ला याना करून आपला विधानसभेचा पुढील मार्ग मोकळा करण्याकरिता आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी अजित दादा पक्षाचे नगरसेवक नजीब मुल्ला याना ठामपा विरोधी पक्ष नेता बनवतील का ? कि आपल्या पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान याना विरोधी पक्ष नेता होण्याची संधी देतील,अशी मोठी चर्चा ठाण्यात सुरु झालेली आहे.(Thane Municipal Corporation)
विधानसभेच्या निवडणुकीत नजीब मुल्ला यांनी आमदार जितेंद्र आव्हाड याना मोठी टक्कर दिली होती, यामुळे दोन कट्टर विरोधी आता ठामपा विरोधी पक्ष नेता निवडीकरिता एकत्र येतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.(Thane Municipal Corporation)
"येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे, हा एक भाग असून ठाणेपालिकेत विरोधी बाकावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बसलेले असताना भ्रष्टाचारासारख्या चुकीच्या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आवाज उठवण्याचे काम करु शकतो. भविष्यात दोन्ही पक्ष एकञ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला हे अभ्यासू नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्ष या नावाचा निश्चित विचार करेल", अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली होती. यामुळे ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) विरोधी पक्ष नेते पदाचा मार्ग मोकळा करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढील विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्याची देखील तयारी सुरु झाली असल्याचे बोलले जात आहे.(Thane Municipal Corporation)