Beef Smuggling Case : गोमांस तस्करी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा

09 Feb 2026 21:39:01
(Beef Smuggling Case)
 
मुंबई : (Beef Smuggling Case) गोहत्या आणि गोमांस तस्करी प्रकरणात (Beef Smuggling Case) गोध्रा सत्र न्यायालयाने दोन जणांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही आरोपी बापलेक असल्याचे समोर आले असून महेबुब अब्दुल्लाह सबुरिया आणि फरहान महेबुब सबुरिया अशी त्यांची नावे आहेत. तसेच आणखी एक आरोपी सलीम सिद्दीक याला मात्र निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.(Beef Smuggling Case)
 
हि घटना ९ जुलै २०२४ रोजी घडली होती. गोध्रा बी डिव्हिजन पोलिस स्टेशनचे अधिकारी गस्तीवर असताना त्यांना गोध्रा-हमीपूर रोडवरील अली मशिदीजवळ एक संशयास्पद वाहन दिसले. त्यांनी वाहन थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही प्रवाशांनी पळ काढला. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली होती.(Beef Smuggling Case)
 
हेही वाचा : Madras High Court : रमजान आणि बकरी ईद वगळता नमाज पठण नाहीच 
 
त्यांच्या गाडीची झडती घेण्यात आली तेव्हा त्यात मांस सापडले. तसेच काही शस्त्रेही सापडली. त्यानंतर गुजरात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिस अधिकारी, साक्षीदार, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसह असंख्य साक्षीदारांची साक्ष घेतली.(Beef Smuggling Case)
 
न्यायालयाने निर्णयात काय म्हटले?
 
शिक्षा सुनावताना न्यायालयाने असे नमूद केले की गुजरातमध्ये गोहत्या बंदी कायदा असूनही दोषी वडील आणि मुलाने घरी मुक्तपणे विक्री करण्याच्या उद्देशाने इतक्या मोठ्या प्रमाणात गोमांस खरेदी करून फसवणूक केली. २०१७ मध्ये सरकारने कायद्यात केलेल्या सुधारणा लक्षात घेऊन जर शिक्षा सुनावण्यात आली तर कायद्याचा मूळ उद्देश कायम राहील आणि समाजात अशा गुन्ह्यांना आळा बसेल आणि असे गुन्हे करणाऱ्यांना कायदेशीररित्या आळा बसेल.(Beef Smuggling Case)
 
 
Powered By Sangraha 9.0