Solapur ZP Election Result live: सोलापुरात माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी संस्कृती सातपुते विजयी

    09-Feb-2026   
Total Views |

Solapur

मुंबई : (Solapur ZP Election Result)
महाराष्ट्रातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडल्यानंतर आज या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. सोलापूरमधील माळशिरसमध्ये आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला असून, जानकर यांचे पुत्र जीवन जानकर पराभूत झालले आहेत; तर माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते विजयी झाल्या आहेत.(Solapur ZP Election Result)

सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली असून या निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुका छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, - कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी पार पडल्या. आज या सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.(Solapur ZP Election Result)

 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\