Sindhudurg ZP Election Result Live: देवगड तालुक्यात भाजप महायुतीला घवघवीत यश; जिल्हा परिषद व पंचायत समितीत विजय

09 Feb 2026 13:27:39

Sindhudurg
 
मुंबई : (Sindhudurg ZP Election Result) महाराष्ट्रातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडल्यानंतर आज या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाली आहे. सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून भाजप महायुतीने अनेक ठिकाणी विजय मिळवत वर्चस्व राखले आहे.(Sindhudurg ZP Election Result)

पुरळ जिल्हा परिषद गट - संजय बोबडी (भाजप - महायुती)
 
पुरळ पंचायत समिती गण - संजना आळवे (भाजप - महायुती)
 
तिरलोट पंचायत समिती गण - रवी तिरलोटकर (भाजप - महायुती)
 
शिरगाव जिल्हा परिषद गट - देवदत्त दामोदर कदम (भाजप - महायुती)
 
तळवडे पंचायत समिती गण - सलोनी संतोष तळवडेकर (शिवसेना - महायुती)
 
देवगड तालुक्यात भाजप महायुतीने आपली मजबूत पकड कायम ठेवत यश संपादन केले आहे. या निकालामुळे भाजप महायुतीचे संघटनात्मक बळ पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.(Sindhudurg ZP Election Result)

Powered By Sangraha 9.0