मुंबई: (Ruby Hall Hospital) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत होते. (Ruby Hall Hospital)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना खोकला, कफ, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. सकाळपासून डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना कार्डियाक अॅम्ब्युलन्सने पुण्यात आणण्यात आले. (Ruby Hall Hospital)
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथम सविस्तर तपासण्या केल्या जाणार आहेत. परिस्थितीनुसार पुढील उपचार व दाखल ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. ग्रँट यांनी दिली. (Ruby Hall Hospital)
दरम्यान, त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे रुग्णालयात उपस्थित आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच ही घटना घडल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. (Ruby Hall Hospital)