मुंबई : (PMC Mayor Manjusha Nagpure) पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरे आणि उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडणुकीमुळे पुणे महापालिकेतील सत्ताकारणाचं चित्र स्पष्ट झालं असून पुढील काळात शहर विकासाशी संबंधित निर्णयांकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. (PMC Mayor Manjusha Nagpure)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्राय बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे या निवडणुकीत नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय झाला आहेत. (PMC Mayor Manjusha Nagpure)
कोण आहेत मंजुषा नागपुरे ?
मंजुषा नागपुरे या पुणे महानगरपालिकेतील सर्वांत उच्चशिक्षित नगरसेविकांपैकी एक आहेत. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पती दीपक नागपुरे हे कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते व भाजपाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातूनच महिला राखीव जागेवरून त्यांनी निवडणूक राजकारणात प्रवेश केला. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. (PMC Mayor Manjusha Nagpure)
पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर
भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पती उपमहापौर झाले आहेत. (PMC Mayor Manjusha Nagpure)