मुंबई: (Maharashtra ZP Election Results 2026) नगर परिषद आणि महापालिकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. शनिवारी झालेल्या मतदानानंतर आज, सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले होते. (Maharashtra ZP Election Results 2026)
१२ जिल्हा परिषदा... (Maharashtra ZP Election Results 2026)
पुणे
सोलापूर
कोल्हापूर
सातारा
छत्रपती संभाजीनगर
सांगली
रायगड
लातूर
रत्नागिरी
धाराशिव
परभणी
सिंधुदुर्ग
आतापर्यंतच्या कलानुसार जिल्हा परिषदांमध्येही भाजपचा जोरदार बोलबाला दिसत आहे. १२ पैकी ७ जिल्हा परिषदांमध्ये भाजप आघाडीवर, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २ ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र आहे. (Maharashtra ZP Election Results 2026)
पंचायत समित्यांमध्येही साधारण असंच चित्र दिसत आहे. एकूण १२५ पंचायत समित्यांपैकी ८४ ठिकाणी भाजप आघाडीवर असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. पक्षनिहाय पाहिल्यास भाजप सुमारे २५, शिवसेना १५ आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला १८ ठिकाणी आघाडी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचं मानलं जात आहे. (Maharashtra ZP Election Results 2026)
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी प्रचार मर्यादित ठेवला होता. तरीही पुणे जिल्ह्यात, जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. (Maharashtra ZP Election Results 2026)
ठाकरे गटाची स्थिती काय? (Maharashtra ZP Election Results 2026)
ग्रामीण भागात संघटन विस्तारासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचं अस्तित्व फारसं ठळकपणे जाणवत नाही. काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळालं असलं तरी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. (Maharashtra ZP Election Results 2026)