Abhimanyu Pawar : "विजय साधेपणाने...", अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांचे आवाहन

    09-Feb-2026   
Total Views |


Abhimanyu Pawar
 
मुंबई : (Abhimanyu Pawar appeal) महाराष्ट्रातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्य शोकाकुल असताना निवडणुकांतील विजय साधेपणाने साजरा करा, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.(Abhimanyu Pawar appeal)

काय म्हणाले अभिमन्यू पवार?

अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट करत म्हटलंय की, "आज जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल लागणार आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाच्या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसहित जे कोणी विजयी होतील त्यांना माझे नम्र आवाहन आहे की आपला विजय शक्य तितक्या साधेपणाने साजरा करावा."(Abhimanyu Pawar appeal)
"
राज्यात अजित पवार यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत असताना, निकालानंतर अनावश्यक जल्लोष टाळण्याचे आणि सामाजिक जबाबदारीने वागण्याचे आवाहन त्यांनी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. उमेदवारांनी संयम आणि संवेदनशीलतेने वर्तन करावे, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.(Abhimanyu Pawar appeal)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\