Madras High Court : रमजान आणि बकरी ईद वगळता नमाज पठण नाहीच

09 Feb 2026 21:33:43
Madras High Court
 
मुंबई : (Madras High Court) तमिळनाडूच्या मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम टेकडीवर प्राण्यांच्या बलिदानावर बंदी घालणारा आणि मुस्लिमांना रमजान आणि बकरी ईद वगळता नमाज पठण न करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा (Madras High Court) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सोमवारी यावर सर्वोच्च न्यायालयात (Madras High Court) सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२५ रोजीचा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.(Madras High Court)
 
मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दिलेल्या निर्णयावर टेकडीवरील सिकंदर दर्ग्याचे उपासक एम. इमाम हुसेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि पीबी वराळे यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्याचबरोबर टेकडीवरील दगडी स्तंभावर कार्तिगाई दीपम् लावण्यास परवानगी दिली.(Madras High Court)
 
हेही वाचा : Sonu Sood: ऑनलाइन गेमच्या व्यसनाने गाझियाबादमध्ये तीन बहिणींचा मृत्यू, सोनू सूदची भावनिक प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला? 
 
सर्वोच्च न्यायालयाने (Madras High Court) सांगितले की, मुस्लिमांना रमजान आणि बकरी ईद वगळता टेकडीवर नमाज अदा करण्याचा अधिकार नाही. तसेच या परिसरात प्राण्यांचे बलिदान देता येणार नाही. तसेच दगडी स्तंभावर दिपम् लावण्याविरुद्ध घेतलेले आक्षेप फेटाळून लावत ही प्रथा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला.(Madras High Court)
 
 
Powered By Sangraha 9.0