ठाणे : (Chinmay Mission) परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्थापन केलेल्या विश्वव्यापी चिन्मय मिशनला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. या अमृत्व महोत्सवाप्रीत्यर्थ संपूर्ण जगभर अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. भारतातील चिन्मय मिशनच्या सर्व सेंटरमध्ये ३०० दिवस गुरुपादुका पूजन होणार आहे. बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ या दिवशी चिन्मय मिशनच्या (Chinmay Mission) ठाणे केंद्रामध्ये हा सोहळा संपन्न झाला.(Chinmay Mission)
अमृतवाहिनी मधून गुरुपादुकांचे सेंटरच्या परिसरात आगमन झाले. लेझीम, फुगड्या आणि ढोल ताशांच्या दुमदुमणाऱ्या आवाजात गुरुपादुकांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. ठाणे सेंटरच्या आचार्या स्वामिनी अनघानंदजी यांनी आपल्या मस्तकावर पादुका ग्रहण केल्या नंतर सर्व साधक, भक्तगणही पादुकांच्या पवित्र स्पर्शाने पावन झाले.(Chinmay Mission)
ठाणे सेंटरमध्ये अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने पादुका पूजन झाले. यासाठी संपूर्ण भारतभर अमृतवाहिनी मधून पादुका घेऊन जाणाऱ्या स्वामी अनुकूलानंदजी, भारत युवा संघाचे संचालक आणि चिन्मय मिशन नांदेड शाखेचे आचार्य स्वामी प्रत्ययानंदजी यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत धार्मिक वातावरणात एक तास गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न झाल्यावर गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे सामुदायिक पठण झाले. यामध्ये ठाणे सेंटर मधून राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी झालेले सहा आणि राष्ट्रीय स्पर्धेत विजयी झालेले दोन विद्यार्थी प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.(Chinmay Mission)
हेही वाचा : Sindhudurg ZP Election Result Live: देवगड तालुक्यात भाजप महायुतीला घवघवीत यश; जिल्हा परिषद व पंचायत समितीत विजय
श्रीमद्भगवद्गीतेतील महत्वपूर्ण पाच श्लोकांचे जगातील चिन्मय मिशनच्या सर्व साधकांनी रोज पठण करावे, या अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत निर्माण केलेल्या गीता पंचामृत या पवित्र पुस्तिकेचे स्वामी अनुकूलानंदजी यांच्या पावन हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर स्वरांजली भजनी मंडळ, ठाणे यांनी सादर केलेल्या भजनांमध्ये सर्व भक्तगण भक्ती रसात न्हाऊन निघाले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ठाण्यातील आणि आजूबाजूच्या उपनगरांतील असंख्य साधक, भक्तगण आणि रहिवासी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.(Chinmay Mission)
स्वामिनी अनघानंदजी,आचार्या चिन्मय मिशन, ठाणे यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाने आणि सर्व सेविकांच्या अथक परिश्रमाने पूज्य गुरुदेव आणि परमेश्वर निश्चितच प्रसन्न झाले असतील.(Chinmay Mission)