राष्ट्रप्रथम भावनेतून येणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाचे संघाच्या व्यासपीठावर स्वागत - नवनाथ बन

    08-Feb-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : ( Navnath Ban ) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रत्येक देशभक्त नागरिक जो राष्ट्र प्रथम, भारत माता की जय, वंदे मातरम् या अजेंड्यावर असतो त्याचे स्वागत केले जाते. तिथे हिंदू मुस्लिम द्वेष केला जात नाही. अनेक मुस्लिम लोक राष्ट्रप्रथम भावनेतून येतात त्या प्रत्येकाचे संघाच्या व्यासपीठावर स्वागत केल आहे त्याच भावनेतून सलमान खान संघाच्या व्यासपीठावर आले होते. राऊत यांच्यासारख्या बाडग्यांना, हिंदू विरोधींना संघाच्या व्यासपीठावर कधीही स्थान मिळत नाही. भारत मातेला आपला देश मानणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाचं स्वागत संघाच्या व्यासपीठावर होत असतं राऊत यांनी त्यावर बोलू नये." अशी प्रतिक्रिया बन यांनी राऊत यांच्या टीकेला रविवार दि.८ रोजी दिली.
 
"भारतीय जनता पक्षाचा झेंडा मराठीचा आणि अजेंडा हिंदुत्वाचा आहे हे राऊतनी लक्षात ठेवाव त्यामुळेच भाजपाने मराठी महापौर केला. संजय राऊत यांचा झेंडा हिंदुत्वविरोधी आणि अजेंडा औरंगजेब आणि अफजल खानाचा होता. त्यामुळे तुमच्या हिरव्या अजेंड्याला नाकारण्याचे काम मुंबईकरांनी आणि जनतेने केले आहे. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होईल हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द भाजपाने पाळला आहे. रितू तावडे कोणत्या पक्षातून आल्या हे सांगण्यापेक्षा त्या भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत हे महत्वाचे. राऊत यांची मात्र वैचारिक सुंता झालेली आहे."असे परखड मत बन यांनी व्यक्त केले.
 
हेही वाचा : Dr. Mohanji Bhagwat : समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
 
" महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील बांगलादेशी खुसखोरांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर राऊत यांच्या पोटात का दुखू लागले आहे.याच बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकायची हे उबाठाचे धोरण होते. हे मुंबईकरांनी ओळखलं आणि त्यांना घरी बसवले.आमच्या अर्थसंकल्पातील तरतुदीवर बोलण्यापेक्षा काँग्रेसच्या काळात बांगलादेशला भरघोस आर्थिक मदत दिली होती यावर बोलावे.हिंदू मंदिरांबाबत राऊत यांना आता कशी चिंता वाटू लागली आहे. अजाण स्पर्धा घेणे, नमाज पठण करणे, हिंदू विरोधी भूमिका घेणे, देश विरोधी आणि पाकिस्तानधार्जिणी भूमिका हे राऊत आणि उबाठाचे धोरण राहिले आहे."असे स्पष्ट प्रतिपादन बन यांनी केले.