मुंबई : (Ram Kulkarni) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यावर बोलण्याची संजय राऊत यांची मुळात लायकीच नाही. संघ समजून घेण्यासाठी त्यांना चार जन्म घ्यावे लागतील.चित्रपट अभिनेते सलमान खान किंवा इतर विविध क्षेत्रातील मान्यवर संघाच्या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर तुमच्या पोटात गोळा का ?" असा प्रश्न भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी रविवार दि.८ रोजी केला.
हेही वाचा : राष्ट्रप्रथम भावनेतून येणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाचे संघाच्या व्यासपीठावर स्वागत - नवनाथ बन
"संघ म्हणजे राष्ट्रभक्ती मानवतावाद, सुसंस्कृत नागरिक घडवणारा कारखाना होय .संजय राऊत यांनी फालतू बडबड करणं सोडलं तर त्यात महाराष्ट्राचे हित नक्कीच असल्याचा टोलाही कुलकर्णी यांनी लगावला.