अकोल्यातील ‘परी बिंदी घर’ या सौंदर्यप्रसाधन दुकानाच्या आड दुकानाचा मालक रहमान आणि त्याच्या तीन साथीदारांनी एका महिलेचे मानसिक-लैंगिक शोषण केले, तिच्यावर धर्मांतरणाची जबरदस्ती केली. या घटनेमुळे समाजात आक्रोश निर्माण झाला आहे. त्या दुकानावर प्रशासनाने बुलडोझरही फिरवला. पण, प्रश्न इथेच संपत नाही. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा नसल्याने या असल्या गुन्हेगारांचे फावते. महाराष्ट्र सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची घोषणा केली होती, त्याची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्याची वेळ झाली आहे. अकोल्यातील या संतापजनक घटनेचा मागोवा घेणारा हा लेख...
ये आपको ‘परफेक्ट’ आयेगा. अच्छा दिखेगा. बिल्कूल आपके लिये बना हैं जी, आपके लिये ही मैंने साईड में निकाल के रखा था,” असे लडिवाळपणे तो गोलटोपी घातलेला, सुरमा लावलेला, मिशी कापून दाढी वाढवलेला अब्दुल सब्दुल तत्सम व्यक्ती हिंदू महिलेशी बोलत असतो. तर, ‘ये आपको अच्छा दिखेगा’ असे तो ज्या कपड्याबद्दल बोलतो ते काय असते, तर महिलांची अंतवस्त्रे! मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे इथल्या हिंदूंनी जरा डोळे उघडे ठेवा आणि पाहा. रस्त्यावर महिलांची अंतवस्त्रे विकणारे दुकानदार कोण आहेत? शॉपिंग मॉलमध्ये जरी गेलात, तरी या महिला अंतवस्त्राची दुकाने कुणाची आहेत? सुरमा घातलेले आणि मिशी कापून दाढी वाढवून, गोलटोपी घातलेले लोक या दुकानाचे मालक किंवा सेल्समन दिसतील. त्यांच्या दुकानात हिंदू महिलांचीच गर्दी असते. तो असे म्हणताना त्या महिलांना काही वावगे वाटत नाही आणि त्या दुकानदाराला? हे सगळे आठवण्याचे कारण, नुकतीच अकोला येथे घडलेली अत्यंत संतापजनक घटना.
अकोल्यातले ‘परी बिंदी घर’ शहरातले प्रमुख सौंदर्यप्रसाधन साहित्यविक्रीचे दुकान होते. मुली-महिलांची तिथे झुंबड असायची. तीही त्या दुकानात नेहमी जायची. त्या दुकानाचा मालक कोण, तर रहमान ऊर्फ मोहम्मद मुस्तफा सलीम तेली. त्याने त्या महिलेला सांगितले की, नियमित दुकानात येणार्या मुली-महिलांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. दुकानात नवीन वस्तू, साहित्य, सवलती आल्या; तर त्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकत असतो. तिने तिचा मोबाईल नंबर रहमानला दिला. तो तिच्याशी संपर्क साधू लागला. एके दिवशी दुकानात कुणीच नाही असे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तिने नकार देताच तो म्हणाला, "सीसीटीव्हीमध्ये मी जे काही केले, ते रेकॉर्ड झाले.
ते सगळीकडे व्हायरल होईल. तुझी बदनामी होईल.” ती घाबरली. कारण, आजही एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, तर गुन्हेगाराला सजा होतेच. मात्र, अत्याचारित महिलेला समाज आणि तिचे कुटुंब काय पद्धतीने स्वीकारते हे उघड आणि अत्यंत दुःखद सत्य आहे. अपवाद क्षमस्व! त्यामुळे ती महिला घाबरली. नराधम रहमानला आयते सावज भेटले. तो आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्या महिलेवर २०२४ ते २०२६ या दोन वर्षांत अनेकदा बलात्कार केले, तिचे शारीरिक-मानसिक शोषण केले, तिच्याकडून पाच लाख रुपये उकळले. तिच्यासाठी हे सगळे असह्य होते. तिने गुन्हेगारांना गयावया केली, हे सगळे थांबवा. तर त्यांचे म्हणणे, ‘आता तर तुझ्यावर बलात्कार करतानाचे व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत. तुला यातून सुटका करायची असेल, तर तू मुसलमान हो.’ त्यांचे म्हणणे एकून त्या महिलेच्या पायाखालची वाळू सरकली.
कारण, तिने मुस्लीम धर्म स्वीकारला, तरी घरातल्यांना-समाजाला तिला सोडावेच लागणार होते. त्यामुळे मग तिने हिंमत केली आणि तिने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. तिचे म्हणणे की, तीच नव्हे तर अशा हजारो मुली-महिलांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. याचाच अर्थ असा की, मुली-महिलांशी जबरदस्ती अश्लील चाळे करून ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये सगळे रेकॉर्ड आहे याची धमकी देऊन अनेक मुलींचे शारीरिक शोषण तो आणि त्याचे साथीदार करत असणार. भयंकर... अर्थात, या रहमानच्या दुकानात जाऊन बिंदी घेणार्या सगळ्या हिंदूच मुली-महिला असतील. रहमानच्या घरच्या आणि त्याच्या कौमच्या मुली मरतील; पण मेल्या तरी बिंदी लावणार नाहीत. त्यामुळे रहमान आणि त्याचे ते तीन साथीदार यांच्या शोषणाच्या बळी ठरल्या, त्या हिंदू मुलीच!
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रहमान आणि त्याचे साथीदार हिंदू महिलेचे शोषण करत होते, तिला धर्मांतरणाच्या वाटेवर त्यांनी आणून ठेवले होते. हे सगळे दोन वर्षे सुखेनैव सुरू होते. मात्र, याचा पत्ता गावातल्या कुणालाच लागला नाही. अगदी त्या महिलेच्या घरीसुद्धा कुणाला कळले नाही? या महिलेच्या आयुष्याचे सुरू असलेले धिंडवडे कुणालाही जाणवले नाहीत? असे का? आपण विश्वासाने कुणाला तरी सांगावे आणि त्यातून आपली सुटका करून घ्यावी किंवा गुन्हेगारांना सजा मिळवून द्यावी, असे त्या महिलेच्या घरात आणि गावात कुणीच नव्हते? माणसे, नाती एकमेकांपासून इतकी दुरावली आहेत? प्रत्येक शहरात कायदा-सुव्यवस्था ही व्यवस्था आहेच. कुठे काय झाले, कुठे काय चालले याबद्दलची माहिती मिळवण्याची यंत्रणा कार्यरत आहे का? तशी व्यवस्था आहे का? दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. काहीतरी विचित्र सुरू आहे, काहीतरी धोकादायक आहे किंवा होऊ शकते याची यादी प्रशासन किंवा समाज करू शकतो का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या हिंदूंचे डोळे कधी उघडणार? ज्यांच्या घरी कुंकूम-तिलक, टिकली वापरणार्यांना ‘काफीर’ समजले जाते, त्यांच्या दुकानातच टिकली आणि सौंदर्यप्रसाधने घेणार्या कोण, तर हिंदू महिलाच.
‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ ते ‘ड्रग्ज जिहाद’ या सगळ्यांचा वापर केवळ हिंदूंविरोधात होतो, हे जगजाहीर आहे. दररोज अशा घटना उघडकीस येतात. मात्र, तरीही समाजामध्ये जागृती कधी येणार? आपल्या मुलीबाळी, घरातल्या स्त्रिया, नव्हे आजकाल तर पुरुष आणि मुले-बालकही कुठे जातात? कुणाच्या संपर्कात असतात? ते काय करतात? यावर कुणाचेच नियंत्रण नाही? ‘फ्री-स्पेस’ किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नातेसंबंध इतके तकलादू आणि वरवरचे झाले आहेत की, ‘तू तुझे काहीही कर, मी काहीही करेन. एकमेकांना अडवायचे नाही,’ ही अशी भयंकर तडजोड आज अनेक कुटुंबात सुरू आहे. हे का? अर्थात, कुणी कुणावर २४ तास हेरगिरी करू नयेच, कुणावर दडपण-दबाव आणत व्यक्तिस्वातंत्र्य हिरावू नयेच; पण आपण जर एखाद्या वस्तूला ती तुटू नये, फुटू नये म्हणून जपतो, काळजी घेतो, तर जिवाभावाच्या माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी सर्वसमावेशक सकारात्मकदृष्ट्या काळजी घेतलीच पाहिजे.
असो. अकोल्याच्या घटनेमध्ये सौंदर्यप्रसाधने विकणार्या दुकानदार रहमानने आणि त्याच्या तीन साथीदारांनी महिलेवर अत्याचार केले. मुद्दा हा आहे की, शहरात हिंदू व्यक्तीचे दुकान नव्हतेच का? तर असणारच; पण महिला या रहमानच्या दुकानात वस्तू खरेदी करायला जात. कारण सोपे आहे, हिंदू दुकानदार हे फक्त दुकानातील खरेदी-विक्रीच्या बाबतीत ग्राहक महिलांशी संबंध ठेवतील. मात्र, ‘लव्ह जिहाद’च्या घटनेत हे स्पष्ट असते की, रहमानसारखे लोक विशिष्ट लाडिक, आर्जवी भाषा वापरून, अतिकाळजी दाखवत महिलांना भुलवत असतात. अशी काळजी दाखवतात की, महिलांना वाटते या रहमानला माझी किती काळजी आहे, घरातल्यांना कुणालाच इतकी काळजी नाही. तसेच रहमान पद्धतीच्या व्यक्ती हिंदू मुली-महिलांना वस्तू खरेदी करताना सवलती देतात. अगदी भाजीवाला असेल तर म्हणणार, ‘आप से क्या ज्यादा लेना भाभीजी, आप घर के ही तो हैं.’
रिक्षावाला असेल तर म्हणणार, ‘अरे रहने दो, पैसा कहा भागा जा रहा हैैं, की फिर मिलेंगे तो दे देना,’ तिने परत भेटावे यासाठी जाळे टाकले जाते. दोन-चार रुपये कमी करून महिलांशी संपर्क वाढवणे, ही पहिली पायरीच असते. कुणालाही स्वतःची स्तुती आवडते, तर हे रहमान पद्धतीचे लोक मुली-महिलांची अवास्तव स्तुती करतात. ‘हे क्या बात कर रहे हो, आप तो बीस-बाईस की लगती हो’ असे ते ४०-५० वर्षांच्या महिलेला सहज बोलतात. मुली-महिलांना फसवण्याच्या या पद्धती त्यांना चांगल्याच अवगत आहेत. ते तसे आहेत; पण हिंदूंचे काय? मुली अब्दुल-सब्दुलच्या प्रेमात का पडतात? याचे कारण जर कुणी म्हणत असेल की, ते काळी जादू करतात. तर हे उत्तर चूक आहे, असे मी खात्रीने म्हणू शकते. ते काळी जादू करत नाहीत, तर मुली-महिलांच्या मनातल्या वासना जागवणे, त्यात त्यांना वाहवत नेणे, त्यांची कमकुवत बाजू हेरून त्याबाबत त्यांना भीती दाखवणे, जबरदस्तीने किंवा फसवून शारीरिक संबंध ठेवणे आणि त्याचे रेकॉर्डिंग करून ते इतरांना दाखवायची धमकी देणे आणि तिचे शारीरिक शोषण करणे, हीच पद्धती आहे.
या सगळ्यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे समाजात, कुटुंबामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि सर्वप्रकारच्या जिहादवर जागृती होणे. आपली संस्कृती, आपला धर्म, आपला समाज, आपले कुटुंब याबद्दल घरातील सगळ्यांनाच आपुलकी-आदर कसा वाटेल, असे वातावरण घरात निर्माण करणे, वस्तू किंवा इतरही व्यवहार जे आपला धर्म-संस्कृती जपतात, मानतात त्यांच्याशी करणे गरजेचे आहे. आपल्या समाजधर्माच्या माणसाशी व्यवहार करणे, हे काही द्वेष पसरवणे होऊ शकत नाही. कारण, समाजधर्म सशक्त झाला, तर तो त्या समाजातील व्यक्तीचे संरक्षण करतो, हा इतिहास आहे. बाकी लेखाच्या शेवटी एक घटना सांगते. जिममध्ये चार-पाच किशोरवयीन मुली व्यायाम करायला जायच्या. चार हिंदू, तर एक मुस्लीम. हिंदू मुली आधुनिक; पण त्यांना शोरमा, बिर्याणी वगैरे मांसाहारी पदार्थांची चटक लागलेली.
त्यांना जिम ट्रेनरने डाएट चार्ट दिला. चार हिंदू मुली म्हणाल्या, "अरे आता चिकन बिर्याणी कशी खाणार? शोरमा कसे खाणार? टीचर काहीतरी यात पर्याय द्या ना.” थोड्या वेळाने सगळ्या घरी जायला निघाल्या. मग ती मुस्लीम मुलगी म्हणाली, "अरे, हमारी अम्मीजान तो डाएट की चिकन बिर्याणी, शोरमा बनाती हैं. माशाअल्ला खूब बनाती हैं.” मग काय डाएट बिर्याणी, शोरमा खायला या चार मुलींनी तिच्या घरी जायची तयारी केली. पुढे काय झाले असेल? खरेच डाएट बिर्याणी, शोरमा असू शकते का? आज हिंदूंच्या वस्तीमध्ये सर्रास असे चिकन शोरमा हब आहेत. बघा तिथे गर्दी कुणाची आहे? अर्थात, मांसाहार करणे चुकीचे नाही. ज्याची-त्याची आवड; पण त्या बिर्याणी- शोरम्याच्या आड काय शिजते, हे कधीतरी समजून घेतले पाहिजे. ‘परी बिंदी घर’च्या घटनेने अशा कितीतरी घटना, कितीतरी प्रकार पुन्हा-पुन्हा आठवत आहेत. ‘परी बिंदी घर’ अकोल्यातच आहेत का? आपल्या गावात आणि शहरातही असणार! तरी सावधान!!!