मुंबई : (Pawan Kalyan) आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी सनातन धर्माची थट्टा करणाऱ्यांविरोधात आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी याबाबत वेदना व्यक्त केलीय. (Pawan Kalyan) “प्रत्येक भक्तावर एक धार्मिक जबाबदारी असते. आणि आता त्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, जिथे देवावर श्रद्धा तर आहे, पण जेव्हा आपल्या देवतांची किंवा धर्माची थट्टा केली जाते, तेव्हा आपण दुखावतो, मात्र ती वेदना व्यक्त न करता ‘कर्मावर सोडून’ पुढे निघून जातो. आता हे बदलले पाहिजे.” अशी भावना त्यांनी (Pawan Kalyan) व्यक्त केल्याचे दिसतेय.
पुढे त्यांनी (Pawan Kalyan) म्हटलेय की, “आपण जरी जात, भाषा, प्रदेश किंवा पंथानुसार वेगवेगळे असलो, तरी आपला धर्म एक आहे आणि आपल्या आराध्य देवताही एकच आहेत. जेव्हा कोणी जाणीवपूर्वक आपल्या धर्माचा आणि आस्थेचा अपमान करतो, तेव्हा त्या वेदना, ते दुःख मांडणे आवश्यक आहे. अशा वेळी गप्प बसल्याने आपला आवाज कमकुवत होतो. फक्त भक्त असणे पुरेसे नाही, आपल्याला आपल्या आस्थेचा सजग रक्षकही बनावे लागेल. पवन कल्याण यांनी हेही स्पष्ट केले की हिंदू धर्माचे संरक्षण करणे म्हणजे दुसऱ्या धर्माच्या विरोधात जाणे किंवा त्याचा अपमान करणे नव्हे, तर आपल्या धर्माची गरिमा आणि सन्मान जपणे होय.
पश्चिम बंगाल, तेलंगणा यांसह अनेक राज्यांतून अशा घटना समोर आल्या आहेत, जिथे कट्टरपंथीयांकडून जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. ताजी घटना यावर्षी जानेवारी महिन्यातील आहे. काँग्रेसशासित तेलंगणातील हैदराबाद येथे कट्टामैसम्मा देवी मंदिराजवळ एका मुस्लिम व्यक्तीने लघुशंका करून परिसर अपवित्र केला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र काहींनी आरोपी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचे सांगत त्याचा बचाव केला.(Pawan Kalyan)
‘सनातन धर्म बदनाम करणाऱ्यांना सहकार्य नाही’
पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये देशातील सर्व मंदिरांतील प्रसाद आणि प्रसादात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी ‘सनातन धर्म प्रमाणन’ प्रणालीचा प्रस्ताव मांडला होता. तिरुपती येथे झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी सनातन धर्माला बदनाम करण्याचा किंवा त्याविरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती व संघटनांशी सहकार्य न करण्याचे आवाहन केले होते.(Pawan Kalyan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक