मुंबई : (Sunil Thapa) नेपाळी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व ख्यातनाम अभिनेते सुनील थापा (Sunil Thapa) यांचे वयाच्या ६८व्या वर्षी मंगळवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी काठमांडू येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने नेपाळी चित्रपटसृष्टीसह एकूणच कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.(Sunil Thapa)
सुनील थापा (Sunil Thapa) यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. काठमांडू येथील थापाथली परिसरातील नॉर्विक हॉस्पिटलचे अध्यक्ष राजेंद्र बहादूर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, थापा यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले व सकाळी ७:४४ वाजता ईसीजी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली.
सुनील थापा (Sunil Thapa) हे नेपाळी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व मानले जात होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. गंभीर, खलनायक तसेच प्रभावी सहाय्यक भूमिका यात त्यांची विशेष ओळख होती.(Sunil Thapa)
हेही वाचा : ‘देवखेळ’ वेबसीरिजचा वाद मिटेना, ठाकरेगटानंतर आशिष शेलारांचीही मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी
नेपाळपुरतेच नव्हे, तर इतरभाषिक सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. बॉलिवूडमधील ‘मेरी कोम’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या प्रशिक्षकांची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. अलीकडेच ते लोकप्रिय वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’ मध्येही झळकले होते. हीच त्यांची शेवटची ऑन-स्क्रीन उपस्थिती ठरली.(Sunil Thapa)
सुनील थापा (Sunil Thapa) यांच्या निधनानंतर नेपाळमधील कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या जाण्याने नेपाळी सिनेसृष्टीने एक अनुभवी, कसदार आणि बहुआयामी कलाकार गमावला आहे.