Ritu Tawde: मुंबईत भाजपच्या रितू तावडे महापौरपदी; म्हणाल्या, "भाजपने मुंबईला..."

07 Feb 2026 13:03:05


 
Ritu Tawde
 
मुंबई: (Ritu Tawde) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केली. तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेकडून संजय शंकर घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पुढील सव्वा वर्षे ते या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. (Ritu Tawde)
 
Mumbai Mayor: मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून नाव जाहीर...; अमित साटम यांनी केली घोषणा, तर उपमहापौरपद शिंदेसेनेला


उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, “महापौरपद मिळालं तरी मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवकांनी पक्षभेद विसरून सभागृहाची गरिमा राखत प्रामाणिक काम करावं, अशी अपेक्षा आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करतो. एका सर्वसामान्य महिलेला हा सन्मान मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता आमचा शहरातील प्रलंबित विकासकामं पूर्ण करण्यावर भर असेल. भाजपने अखेर मुंबईला मराठी महापौर दिली आहे.” (Ritu Tawde)
 
महापौरपदासाठी भाजपमध्ये रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र अखेरीस रितू तावडे यांनी बाजी मारली. यंदाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी अधिकृत निवड होणार असून, निवड झाल्यानंतर रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. (Ritu Tawde)
 


Powered By Sangraha 9.0