Ritu Tawde: भाजपचा ‘मराठी चेहरा’ पुढे; मुंबई महापौरपदाच्या उमेदवार, कोण आहेत रितू तावडे ?

07 Feb 2026 13:52:08
Ritu Tawde 
मुंबई: (Ritu Tawde) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने घाटकोपर पश्चिम येथील नगरसेविका रितू राजेश तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तावडे या पालिकेच्या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तसेच मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. (Ritu Tawde)
 

घाटकोपर पश्चिममधील प्रभाग क्रमांक १३२ हा गुजराती बहुल मतदारसंघ मानला जातो. मात्र तावडे या मराठा समाजातील असून ठाम मराठी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. निवड झाल्यास त्या मुंबईतील भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरतील. (Ritu Tawde)
 
रितू तावडे यांचा राजकीय प्रवास हा स्थानिक प्रश्नांशी जोडलेला राहिला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करताना पालिका शाळांमधील सुविधा, गुणवत्ता आणि पायाभूत सुधारणा यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या निवडीमुळे घाटकोपर आणि ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Ritu Tawde)
 
हेही वाचा : Ritu Tawde: मुंबईत भाजपच्या रितू तावडे महापौरपदी; म्हणाल्या, "भाजपने मुंबईला..."

 
महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार
 
‘महिला आर्थिक विकास महामंडळा’च्या माजी संचालिका म्हणून काम करताना तावडे यांनी महिलांना स्वयंरोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला. विविध योजनांद्वारे अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांत महिलांना कायदेशीर सल्ला आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने सक्रिय असल्याचे कार्यकर्ते सांगतात. (Ritu Tawde)


वैयक्तिक पार्श्वभूमी
 
रितू तावडे यांचं एस.वाय.बी.कॉम शिक्षण झालंय. तर त्या शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा होत्या. तर मुलगी मधुरा तावडे या वकील असून मुलगा यश तावडे हा कॅम्प्युटर इंजिनियर आहे. महापौरपदाची धुरा सांभाळल्यानंतर, 'शासन आपल्या दारी' आणि 'लाडकी बहीण' यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. (Ritu Tawde)
 
हेही वाचा: Mumbai Mayor: मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून नाव जाहीर...; अमित साटम यांनी केली घोषणा, तर उपमहापौरपद शिंदेसेनेला 



गाजलेली आंदोलने आणि सामाजिक कार्य (Ritu Tawde)
 
रितु तावडे यांची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर जनसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून आहे.
 
१. जागतिक स्तरावर दखल (BBC लंडन): महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या विबत्स जाहिराती आणि पुतळ्यांविरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द ‘बीबीसी लंडन’ने घेतली होती. त्यांच्या आंदोलनामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.
 
२. महिला सुरक्षा: पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले होते.

३. पाणी माफियांविरुद्ध लढा: घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ अत्यंत गाजला, ज्यानंतर प्रशासनाने पाणी चोरांवर कडक कारवाई केली.

४. सक्षमीकरण: त्या ‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा असून, ‘महिला आर्थिक विकास महामंडळाच्या’ (MAVIM) माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत.
 
 

Powered By Sangraha 9.0