CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातून नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर

07 Feb 2026 16:36:40
CM Devendra Fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) आता महाराष्ट्राच्या भागात अगदी बोटावर मोजण्याइतके तीन ते चार मोठे नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत. छत्तीगड भागात काही आहेत पण लवकरच त्यांचाही खात्मा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
 
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "गडचिरोली पोलिस आणि सी ६० यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी एक अतिशय महत्वाचे ऑपरेशन केले आहे. नक्षलवाद्यांची केवळ एकच कंपनी शिल्लक राहिली होती. त्यातील मोठ्या ७ लोकांना बाद करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. गडचिरोलीच्या इतिहासातील हे सर्वात कठीण ऑपरेशन होते. आमचे पोलीस तीन दिवस हे ऑपरेशन राबवत होते. हा तो भाग आहे ज्या भागात आपण फारसे ऑपरेशन करत नाही. या भागात पोलिसांनी दोन घेरे घातले आणि प्रचंड गोळीबार होत होता. यात ७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून त्यांचा म्होरक्या प्रभाकर हादेखील मारला गेला आहे."(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Ritu Tawde: रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित; उबाठा गट मैदानाबाहेर 
 
"त्यामुळे आता महाराष्ट्राच्या भागात अगदी बोटावर मोजण्याइतके तीन ते चार मोठे नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत. छत्तीगड भागात काही आहेत पण लवकरच त्यांचाही खात्मा होईल. आमच्या पोलिसांने केलेले कार्य मोठे आहे. दुर्दैवाने यात एक पोलिस शहीद झाला असून त्यांच्या कुटुंबियांची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे पोलिस विभागाचे अभिनंदन करतो."(CM Devendra Fadnavis)
 
तेलंगणा सरकारचे लांगुलचालनाचे राजकारण
 
"तेलंगणा सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लांगुलचालनाचे काम सुरु आहे. या देशात जेव्हा जेव्हा लांगुलचालनाचे राजकारण झाले, त्या त्या वेळी देशाने त्याचे नुकसान भोगले आहे. तरीही मतांसाठी हे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतू, लोक त्याला साथ देणार नाहीत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0