मुंबई: (Mumbai Mayor) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर रितू तावडे यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Mumbai Mayor)
दरम्यान, उपमहापौरपदासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार राहुल शेवाळे यांनी केली. (Mumbai Mayor)
रितू तावडे यांची नगरसेवक म्हणून ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना प्रभावी कामगिरी केली होती. ५३ वर्षीय रितू तावडे या युवा, आक्रमक आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पक्षातील त्यांची मजबूत पकड आणि कामाचा अनुभव लक्षात घेता महापौरपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. (Mumbai Mayor)