मुंबई: (Kishori Pednekar) भारतीय जनता पक्षाने मुंबई महापौरपदासाठी रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आकड्यांचे राजकारण मान्य असल्याचे सांगितले. (Kishori Pednekar)
हेही वाचा: Ritu Tawde: रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित; उबाठा गट मैदानाबाहेर
याबाबत माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, “मुंबईला आता मराठी महापौर मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. लोकशाहीतील आकड्यांचा खेळ आणि आकडेवारीचे गणित आम्हाला चांगले समजते आणि आम्ही ते स्वीकारतो.” (Kishori Pednekar)
दरम्यान, भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या निवडीला महायुतीकडून जोरदार पाठबळ मिळाल्याचे चित्र आहे. महापौरपदासाठी उबाठा गट उमेदवार देणार नसल्याचा निर्णय आधीच जाहीर झाला आहे. त्यामुळे तावडे यांच्या निवडीवर आता शिक्कामोर्तब होणे औपचारिकतेपुरते उरले आहे. (Kishori Pednekar)