Dr. Dhanashree Didi Athavale : संस्कृत भाषा टिकल्यास सुसंस्कृतपणा टिकेल : डॉ. धनश्री दीदी आठवले

    07-Feb-2026   
Total Views |
Dr. Dhanashree Didi Athavale
 
मुंबई : (Dr. Dhanashree Didi Athavale) व्याकरण हा संस्कृत भाषेचा गाभा आहे संस्कृत भाषा ही देववाणी असून त्यात वेद,उपनिषदे, भगवद्गीता, पुराण यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला संस्कृत भाषा यायला हवी. संस्कृत भाषा शाळेत शिकवणे अत्यावश्यक आहे. संस्कृत भाषा टिकली तरच संस्कार,संस्कृती आणि सुसंस्कृतपणा टिकेल असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख डॉ. धनश्री दीदी आठवले (Dr. Dhanashree Didi Athavale) यांनी केले.(Dr. Dhanashree Didi Athavale)
 
हेही वाचा : चित्रांमधून उमटलेला तत्त्वविचार 
 
संस्कृत भाषा सभा आणि सावाना नाशिक यांच्यावतीने डॉक्टर वि. म. गोगटे स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. ३ फेब्रुवारी प.सा. नाट्यगृह नाशिक येथे झाले. यावेळी व्यासपीठावर संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख, उपाध्यक्ष श्रद्धा शहा, सहकार्यदर्शिनी तेजश्री वेदविख्यात, संस्कृत भाषा सभेचे सल्लागार डॉक्टर विकास गोगटे व विवेक गोगटे,स्वाध्याय परिवाराचे राजीव पटेल,सावाना अध्यक्ष दिलीप फडके, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, सोमनाथ मुठाळ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना तळवलकर यांनी कितीही प्रयत्न केले तरी कधीही संस्कृत बोलीभाषा होऊ शकणार नसल्याचे नमूद केले. संस्कृत भाषेत तत्त्वज्ञान निर्माण झाले असल्याने तत्त्वज्ञानासाठी संस्कृत शिकायला पाहिजे. संस्कृत आवडते म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष मी किंवा स्वाध्याय परिवार ही करीत नसल्याचे तळवलकर यांनी नमूद केले. संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्कार २०२६ संस्कृत भाषा प्रसारिणी सभा ठाणे यांना देण्यात आला. पुरस्कारार्थी संस्थेस ₹२१,००० शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास हजिरनिस व संस्था कार्यवाह ऋतुजा वेलणकर उपस्थित होत्या.यावेळी विवेक गोगटे, ऋतुजा वेलणकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार रमेश गायधनी यांनी मानले.(Dr. Dhanashree Didi Athavale)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.