Gadchiroli Naxalism: गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश; २ तळ उद्ध्वस्त, C-60 चे जवान दीपक मडावी यांना वीरमरण

07 Feb 2026 19:02:56
 
Gadchiroli Naxalism
 
गडचिरोली: (Gadchiroli Naxalism) जिल्ह्यातील नारायणपूर सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत C-60 पथकाला मोठे यश मिळाले आहे. धाडसी कारवाई करत जवानांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत ७ माओवाद्यांचे मृतदेह आणि ५ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (Gadchiroli Naxalism)
 
मात्र या चकमकीदरम्यान C-60 पथकातील शूर जवान दीपक चिन्ना मडावी हे गोळी लागून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. (Gadchiroli Naxalism)
 
राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि माओवादाच्या समूळ उच्चाटनासाठी दिलेले दीपक मडावी यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही, अशी भावना पोलीस दल आणि प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दल आणि राज्य शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही सांगण्यात आले. (Gadchiroli Naxalism)
 
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून विविध लाभांसह ₹२.२५ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात येणार असून कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. शूर जवान दीपक चिन्ना मडावी यांना सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. (Gadchiroli Naxalism)
 
 
Powered By Sangraha 9.0