मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांनी अनेक वर्षे चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपल्या कामाची छाप उमटवली आहे. पण, त्यांच्या कारकिदची सुरुवात ही एका वेगळ्याच कामाने झाली होती. नुकतीच त्यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने खास बातचीत केली. यावेळी अशोक शिंदे यांनी त्यांच्या सिनेकारकिदविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
अभिनयक्षेत्रात काम करायला तुमच्या वडिलांचा विरोध होता. तो नेमका का?
आम्ही सुरुवातीला मुंबईत होतो, नंतर वडिलांच्या नोकरीमुळे पुण्याला आलो. ‘आकाशवाणी’च्या ‘सर्व्हिस साँग ॲण्ड ड्रामा डिव्हिजन’मध्ये काम करत होतो. पुण्यात आल्यावर मी आपटे प्रशालेत प्रवेश घेतला. लहानपणापासूनच मला नाटकाची प्रचंड आवड होती. मात्र, वडिलांचा या क्षेत्राला ठाम विरोध होता. तरीही, ते ऑफिसमध्ये ‘स्टेज डेकोरेटर’ म्हणून काम करत असल्याने रंगभूमीशी त्यांचा अप्रत्यक्ष संबंध होता. त्यांचा या क्षेत्रात येण्याला विरोध नेमका का होता, हे मला तीन वर्षांनंतर कळलं. घरी बाबांना विचारल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “तू अभिनयाच्या क्षेत्रात जायचं नाही. त्या काळात डॉक्टर, इंजिनिअर होणं हेच प्रत्येक पालकाचं स्वप्न होतं. हे क्षेत्र शाश्वत नाही, यामध्ये कुठलीच खात्री नाही. आज काम असेल, उद्या नसेल; दोन, पाच किंवा दहा वर्षे सातत्याने काम मिळेलच याची हमी नाही. पुढे संसार, कुटुंब, जबाबदाऱ्या यांची गॅरेंटी कोण घेणार?” असा त्यांचा प्रश्न होता.
मी त्यांना म्हटलं की, “तुमचे मित्र निळू फुले, दादा कोंडकेंसारखे ‘सुपरस्टार’ आहेत. त्यावर त्यांनी उदाहरण देत सांगितले की, “निळू फुले यांना मोठी ओळख 49व्या वष, दादा कोंडके यांचा सुवर्णकाळ 49 नंतर, तर डॉ. श्रीराम लागू हे 46व्या वष ‘पिंजरा’चे नायक झाले. एवढा मोठा संघर्षाचा काळ तू कसा पार करणार?” असा त्यांचा सवाल होता. त्यामुळेच त्यांना ही वाट निवडायची नव्हती. पण, शेवटी म्हणतात ना, कोंबडा आरवायचा असतो, तो आरवतोच!
तुमची कारकीर्द अभिनेता म्हणून नव्हे तर ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून सुरु झाली. तो एकंदरीतच अनुभव कसा होता?
होय, माझी कारकीर्द ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणूनच सुरू झाली. पुण्यातील जवळजवळ 99 टक्के शाळा, मुलींच्या शाळा, नाईट स्कूल्स आणि प्रायोगिक नाटकांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. हुजूरपागा, रेणुका स्वरूप, कन्या शाळा यांसह अनेक ठिकाणी मी मेकअपचे काम केले. प्रकाशचंद्र, डॉ. काशिनाथ घाणेकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, सरनाईक यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तब्बल 17 वर्षे ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याचा अनुभव मला मिळाला. हे सगळं करत असतानाच, मी शिक्षणही सुरू ठेवलं. बारावी झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि पुण्यातून ‘बीई’ (इलेक्ट्रॉनिक्स) पूर्ण केलं. ही बाबांची ठाम अट होती.
मराठी चित्रपटांकडे तुम्ही कसं पाहता? पूवचे चित्रपट आणि आताचे चित्रपट यामध्ये काय मूलभूत फरक आहे? तसेच आताचे बरेच मराठी चित्रपट का चालत नाहीत?
खरं सांगायचं तर हा खूप चांगला प्रश्न आहे. आज चित्रपटांची संख्या प्रचंड वाढली आहे. आमच्या काळात, विशेषतः 90च्या दशकात वर्षाला साधारण 34-35 मराठी चित्रपट प्रदर्शित व्हायचे. आता सरकारकडून प्रत्येक चित्रपटाला 40 लाख रुपयांचं अनुदान मिळतं, ही अभिमानास्पद गोष्ट. पण, याचा एक परिणाम असा झाला की, कोणीही चित्रपट बनवायला लागलं; कोणी 20 लाखांत, कोणी 15 लाखांत, तर कोणी थेट मोबाईलवर. चित्रपट निर्मितीचा प्रत्येकाला अधिकार आहेच, यात शंका नाही. पण, मराठी प्रेक्षकांचीही खर्च करण्याची मर्यादा आहे. आज मराठी चित्रपट व्यवसाय मर्यादित राहण्यामागचं मोठं कारण म्हणजे चित्रपटगृहांची कमतरता. एक साधं उदाहरण घ्या, एखाद्या हिंदी चित्रपटाने 600 कोटींची कमाई केली, तर सरासरी 200 रुपयांचं तिकीट धरलं, तरी तो चित्रपट सुमारे तीन कोटी प्रेक्षकांनी पाहिलेला असतो. देशाची लोकसंख्या 140 कोटी असताना एवढेच लोक चित्रपट पाहू शकतात. कारण, सगळीकडे अजूनही चित्रपटगृहे नाहीत. कोकणात अनेक ठिकाणी मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृह उपलब्ध होत नाही. त्यामुळे लोक ‘टीव्हीवर आला की चित्रपट पाहू’ असंच म्हणतात. कोपरगाव, शिड, माळशिरस आणि विदर्भातील मोठ्या भागातही चित्रपटगृहांची परिस्थिती तशीच आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 13 कोटी आहे. यापैकी केवळ एक ते दीड कोटी लोकांनी जरी चित्रपट पाहिला, तरी साध्या तिकीटदरातही मराठी चित्रपट सहज 100 कोटींचा टप्पा गाठू शकतो.