Pt. Rajaram Jamsandekar : दिवंगत गुरुवर्य पं. राजाराम जामसांडेकर यांच्या शोकसभेचे आयोजन

07 Feb 2026 21:16:49
Pt. Rajaram Jamsandekar

मुंबई : (Pt. Rajaram Jamsandekar) महाराष्ट्राच्या लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत परंपरेला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या पंडित राजाराम जामसांडेकर (Pt. Rajaram Jamsandekar) यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते ८ या कालावधीमध्ये चिंचपोकळीच्या सातरस्ता येथील मुंबई पब्लिक स्कूल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(Pt. Rajaram Jamsandekar)
 
पंडित राजाराम जामसांडेकर (Pt. Rajaram Jamsandekar) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी लोककला, शास्त्रीय संगीत, रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.पंडित राजाराम भाऊ जामसंडेकर यांनी आपल्या आयुष्यातील अनेक दशके संगीतसेवेला अर्पण केली. राम-लक्ष्मण, लक्ष्मीकांत–प्यारेलाल, विश्वनाथ मोरे, राम कदम यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी सहाय्यक वादक म्हणून उल्लेखनीय काम केले.(Pt. Rajaram Jamsandekar)
 
हेही वाचा : Dr. Dhanashree Didi Athavale : संस्कृत भाषा टिकल्यास सुसंस्कृतपणा टिकेल : डॉ. धनश्री दीदी आठवले 
 
तबला सम्राट उस्ताद जाकीर हुसेन यांच्यासोबत त्यांनी चेन्नईसह देश-विदेशात अनेक कार्यक्रम सादर केले आणि भारतीय तालवाद्यांची पताका जगभर फडकावली. पंडित भवानी शंकर यांचे ते अत्यंत जवळचे स्नेही होते. शास्त्रीय संगीतातील अनेक जुग Pt. Rajaram Jamsandekar लबंदी कार्यक्रमांतून त्यांनी रसिकांची मने जिंकली.१९८३ साली लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यासोबत ते करमत (कझाकस्तान) येथे गेले होते. त्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करत २५ राष्ट्रांमध्ये भारताला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या ऐतिहासिक मंचावर राजाराम भाऊ यांची ढोलकी संपूर्ण रंगमंचावर गाजली होती आणि भारतीय लोकसंगीताचा नावलौकिक वाढवला होता.(Pt. Rajaram Jamsandekar)
 
 
Powered By Sangraha 9.0