Sunil Shetty : फक्त मुघलांवरच का, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजपूत राजांवर चित्रपट का नाही?

अभिनेता सुनील शेट्टीचा चित्रपटसृष्टीला प्रश्न

Total Views |
Sunil Shetty
 
मुंबई : (Sunil Shetty) आपली चित्रपटसृष्टी फक्त औरंगजेब, अकबर, बाबर आणि बिरबलबद्दलच बोलते. आपला इतिहास आपल्या संस्कृतीबद्दल असला पाहिजे. त्यामुळे चित्रपट देखील आपवे वेद, महान राजपूत राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बनावेत, असे मत अभिनेते सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी व्यक्त केले. ते लहरन रेट्रो या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
 
भारतीय चित्रपटसृष्टीविषयी आपली नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, भारतातील प्रत्येक राज्याचा स्वतःचा नायक असतो आणि चित्रपटसृष्टीने त्या नायकांच्या कथा जगासमोर आणल्या पाहिजेत. आपल्या देशात राजपूत राजे आणि शिवाजी महाराजांवर चित्रपट का बनवले जात नाहीत, फक्त अकबर आणि बाबरवरच का बनवले जातात.(Sunil Shetty)
 
ते (Sunil Shetty) पुढे म्हणाले की, जर चित्रपट उद्योगाला प्रेक्षकांशी जोडायचे असेल तर दिल्ली सल्तनतच्या पलीकडे विस्तार केला पाहिजे आणि संपूर्ण भारताच्या गौरवशाली भूतकाळाचा शोध घेतला पाहिजे. चित्रपट फक्त मुघल राजेशाहीपुरते मर्यादित नसावे. सध्याच्या पिढीला बाहेरून येणारेच शिकवले आणि दाखवले जात आहे. आपल्या स्वतःच्या मातीचा अभिमान दुर्लक्षित केला गेला आहे.(Sunil Shetty)
 
सोमनाथ मंदिर हे भारताच्या श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक
 
सुनील शेट्टीने (Sunil Shetty) सोमनाथ मंदिराशी असलेल्या त्याच्या भावनिक नात्याचाही उल्लेख केला. तो म्हणाला की हे मंदिर अनेक वेळा लुटले गेले आणि उद्ध्वस्त झाले, तरीही ते आजही मजबूत उभे आहे. ही केवळ एक इमारत नाही तर भारताच्या श्रद्धेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.(Sunil Shetty)
 
अक्षय कुमारनेही केले होते प्रश्न उपस्थित
 
यापूर्वी पृथ्वीराज चौहान या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अक्षय कुमारने भारतीय इतिहास अभ्यासक्रमात आपल्या संस्कृती वर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली होती. तो म्हणाला होता, दुर्दैवाने आपल्या इतिहास अभ्यासक्रमात सम्राट पृथ्वीराज चौहानबद्दल फक्त २-३ ओळी आहेत, तर आक्रमकांबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.